Ration Card Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card: राशनकार्डधारकांना मोठा धक्का, लाखो कार्ड होणार रद्द; राशन मिळणार नाही

Ration Card Cancellation: अपात्र आढळलेल्या लाभार्थ्यांची शिधापत्रिका रद्द करण्यात येणार असून त्यांना राशन मिळणार नाही.

दैनिक गोमन्तक

Ration Card Latest News: तुमच्याकडेही राशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारच्या स्वस्त राशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी नक्की वाचा. यूपीच्या योगी सरकारने शिधापत्रिकेबाबत नवा आदेश दिला आहे. या आदेशान्वये अंत्योदय आणि पात्र घरगुती शिधापत्रिकाधारकांची पडताळणी लवकरात लवकर पूर्ण करावी लागणार आहे. पडताळणीच्या वेळी अपात्र आढळलेल्या लाभार्थ्यांची शिधापत्रिका रद्द करण्यात येणार असून त्यांना राशन मिळणार नाही.

लाभार्थ्यांची माहिती वेळोवेळी बदलते

पडताळणी दरम्यान, नवीन पात्र अर्जदारांच्या शिधापत्रिका जागीच बनवल्या जातील. या संदर्भात यूपीचे खाद्य आणि पुरवठा आयुक्त मार्कंडेय शाही यांनी सर्व जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अतिरिक्त खाद्य आयुक्त अनिल कुमार दुबे यांनी सांगितले की, लाभार्थ्यांनी दिलेली वैयक्तिक माहिती वेळोवेळी बदलत असते.

अपात्रांना यादीतून काढून टाकण्याचा उद्देश आहे

ते पुढे म्हणाले की, 'शिधापत्रिका लाभार्थ्यांच्या यादीत अपात्र घटकांचा समावेश असल्याच्या तक्रारी आहेत. यासाठी 'राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013' अंतर्गत मोहीम राबविण्यात येत आहे. अपात्र आढळलेल्या लाभार्थ्यांच्या जागी पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका (Ration Card) दिल्या जातात.' लाभार्थ्यांच्या यादीतून अपात्रांची नावे काढून पात्र व्यक्तींना संधी देणे हा अशा मोहिमेचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिधापत्रिका पडताळणी वेळोवेळी होते

माहितीच्या आधारे कुटुंबातील सदस्यांची संख्या, वय, राहण्याचे ठिकाण इत्यादी तपशील गोळा करुन डेटाबेस तयार केला जातो. या संदर्भात, संबंधित कार्डधारक मृत्यूच्या आधारावर किंवा कार्डधारकाची आर्थिक स्थिती उत्तम असल्याच्या आधारे अपात्र ठरण्याची शक्यता आहे. सरकारकडून (Government) वेळोवेळी शिधापत्रिकांची पडताळणी केली जाते.

सरकारने गेल्या काही दिवसांत संसदेत दिलेल्या माहितीत सांगण्यात आले की, 2017 ते 2021 पर्यंत डुप्लिकेट, अपात्र आणि बनावट 2 कोटी 41 लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत. यादरम्यान, यूपीमध्येच सर्वाधिक राशन कार्ड, सुमारे 1.42 कोटी कार्ड रद्द करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT