Ration Shop Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card: लॉटरी! केंद्राचा मोठा निर्णय, मोफत राशनबाबतचा नवा नियम देशभर लागू

Ration Card Latest News: राशनकार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने रेशनिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल केला असून, त्याचा फायदा करोडो लोकांना होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Ration Card Update: राशनकार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने रेशनिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल केला असून, त्याचा फायदा करोडो लोकांना होणार आहे. देशभरात मोफत राशन देण्याच्या सुविधेसोबतच सरकारने पोर्टेबल राशन कार्डची सुविधाही सुरु केली आहे. ही सुविधा नुकतीच अनेक राज्यांमध्ये सुरु करण्यात आली आहे, मात्र लवकरच ती देशभरात सुरु करण्याची योजना आहे.

जुन्या कार्डवरच सुविधा उपलब्ध असेल

पोर्टेबल राशनकार्डची (Ration Card) सुविधा लागू झाल्यानंतर तुम्हाला देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राशनची सुविधा सहज मिळेल. यासाठी तुम्हाला वेगळे कार्ड बनवावे लागणार नाही. यासोबतच तुम्हाला तुमच्या जुन्या राशनकार्डवरच सुविधेचा लाभ मिळेल.

डिसेंबरपर्यंत मोफत राशन मिळेल

केंद्र सरकारकडून (Central Government) डिसेंबरपर्यंत मोफत राशनची सुविधा दिली जात आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत, सरकार पात्र लाभार्थ्यांना महिन्यातून दोनदा राशन कोटा देत आहे, ज्यामुळे देशातील करोडो लोकांना फायदा होत आहे. एकदा राशनचे वितरण निश्चित किंमतीवर केले जाते. तर दुसऱ्यांदा गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत वाटप करण्यात आले आहे.

साखरही मोफत मिळते

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत राशन सुविधा दिली जाते. यामध्ये गहू आणि तांदूळ व्यतिरिक्त अनेक राज्यांमध्ये तेल, मीठ आणि साखरही दिली जात आहे. यासोबतच 12 किलो मैदा आणि 500 ​​ग्रॅम साखरही अनेक राज्यांमध्ये देण्यात आली आहे.

कोणतीही त्रुटी असू शकत नाही

मोफत राशन पुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सरकार टेक होम राशन प्रणाली ऑनलाइन करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून पुरवल्या जाणाऱ्या राशनमध्ये कोणतीही अडवणूक करता येणार नाही. THR प्रणाली सुरु केल्यानंतर, प्लांटपासून राशन वितरणापर्यंतच्या सर्व कामांचा मागोवा घेता येईल आणि त्याचे निरीक्षणही करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT