Railway Budget  Dainik Gomantak
अर्थविश्व

Railway budget 2022: देशात नव्या 400 वंदे भारत ट्रेन्स सुरू होणार

मेट्रोचे जाळे वाढवणार असल्याचीही घोषणा निर्मला सीतारमण यांनी आज (मंगळवारी) संसदेत 2022 चा अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर करताना केली.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज (मंगळवारी) संसदेत 2022 चा अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर करत आहेत. आपल्या भाषणाच्या काही मिनिटांतच सीतारामन यांनी स्पष्ट केले की हा अर्थसंकल्प पायाभूत सुविधांच्या सुधारणांवर भर देणार आहे. अर्थ मंत्री सीतारमण यांनी भारतीय रेल्वेसाठी 2 मोठ्या घोषणा केल्या आहेत. (Railyway Budget 2022 News Updates)

निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले की, देशात नव्या 400 वंदे भारत ट्रेन्स सुरू केल्या जातील. याचबरोबर देशातील. मेट्रोचे जाळे वाढवणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली. याअंतर्गत देशातली अनेक शहरांमध्ये मेट्रो ट्रेन सुरू केल्या जातील. पुढील तीन वर्षांत 100 गती शक्ती कार्गो टर्मिनल देखील विकसित केले जातील, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्गांची लांबी 2500 किमीपर्यंत वाढवण्याची सरकारची योजना आहे.
भारताच्या पायाभूत विकासाच्या नवीन ब्लू प्रिंटचा एक भाग म्हणून, सीतारमण यांनी प्रधानमंत्री गती शक्ती मास्टरप्लॅनची ​​घोषणा केली, ज्यामध्ये रस्ते, रेल्वे, महामार्ग, बंदरे आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सरकारी खर्च केला जाईल. गेल्या वर्षी अर्थमंत्री सीतारमण यांनी भारतीय रेल्वेसाठी 1.10 लाख कोटी रुपयांचा मोठा निधी जाहीर केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT