Car Discontinue Dainik Gomantak
अर्थविश्व

Car Discontinue: 1 एप्रिलनंतर 'या' गाड्यांचे उत्पादन होऊ शकतं बंद, जाणून घ्या

देशात 1 एप्रिल 2023 पासून नवीन रिअल ड्रायव्हिंग एमिशन (Real Driving Emission) नियम लागू होणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

देशात 1 एप्रिल 2023 पासून नवीन रिअल ड्रायव्हिंग एमिशन (Real Driving Emission) नियम लागू होणार आहेत. यामुळे वाहन निर्मात्यांना त्यांच्या वाहनांचे इंजिन अपडेट करावे लागतील किंवा ते बंद करावे लागतील.देशात 1 एप्रिल 2023 पासून नवीन रिअल ड्रायव्हिंग एमिशन (Real Driving Emission) नियम लागू होणार आहेत.

यामुळे वाहन निर्मात्यांना त्यांच्या वाहनांचे इंजिन अपडेट करावे लागतील किंवा ते बंद करावे लागतील. याच कारणामुळे अनेक कंपन्या आपल्या गाड्या बंद करणार आहेत. चला तर जणू घेऊ कोणत्या गाड्या बंद केल्या जाऊ शकतात.

गाड्यांचे भाव वाढणार ?

वाहनांवर नवीन नियम लागू झाल्यानंतर वाहन उत्पादक त्यांच्या गाड्यांच्या इंजिनमध्ये बदल करतील किंवा नवीन इंजिन बनवतील. त्यामुळे खर्च वाढून त्याचा थेट फटका ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. 2020 मध्ये BS6 मानक इंजिन सादर केल्यानंतर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या किमतीत वाढ करण्यात आली होती.

डिझेल कारच्या विक्रीत सातत्याने घट-

नवीन नियमांमुळे ग्राहक आता डिझेल कारला कमी पसंती दर्शवत आहेत. याची अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जवळपास समान आहेत. डिझेलमुळे जास्त प्रदूषण होते, डिझेल वाहनांची किंमत पेट्रोल वाहनांपेक्षा जास्त आहे. याशिवाय दिल्लीसारख्या शहरात डिझेल वाहने 15 वर्षेच चालवता येतील. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कंपन्याही हळूहळू डिझेल वाहने बंद करत आहेत.

या गाड्या होऊ शकतात बंद:-

होंडा कंपनीमधील-

  • सिटी फोर्थ जनरेशन

  • सिटी फिफ्थ जनरेशन डिझेल

  • अमेझ डिझेल

  • जाझ

  • WR V

महिंद्रा कंपनीमधील-

  • मराझो

  • अल्टुरस G4

  • KUV 100

इतर कंपनीमधील गाड्या-

  • ह्युंदाई व्हर्ना डिझेल

  • स्कोडा ऑक्‍टिव्हा

  • स्कोडा सुपर्ब

  • टाटा अल्ट्रोझ डिझेल

  • रेनॉल्ट KWID 800

  • निसान किक्स

  • मारुती अल्टो 800

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: रोहित-विराटला जमलं नाही ते शुभमन गिल करुन दाखवणार, ओव्हलवर इतिहास रचण्याची संधी; पहिल्यांदाच घडणार 'हा' पराक्रम

मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं, ग्रामसेवकावर Strict Action; सरदेसाईंकडून प्रमोद सावंतांचे कौतुक, रायच्या 'सायको' सचिवाचीही केली तक्रार

Valpoi News: पुलावरून घेतली उडी, स्थानिकांच्या धाडसामुळे वाचले प्राण; वाळपईत आत्महत्येचा प्रयत्न

Goa Assembly: 'भाजपशासित प्रदेशात अल्पसंख्यांकांना धोका' आलेमाव आक्रमक; 'इतरांची उदाहरणं देऊ नका' मुख्यमंत्र्यांचा पलटवार

Viral: देशाचं नाव खराब होतंय... विदेशी महिलेसोबत तरूणांकडून सेल्फीचा बहाणा, पुढे जे घडलं ते संतापजनक! पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT