Gas Cylinder Dainik Gomantak
अर्थविश्व

महागाईचा पुन्हा सर्वसामान्यांना फटका, घरगुती गॅसच्या दरात 50 रुपयांची वाढ

गॅस सिलिंडरच्या किंमतीत गेल्या आठवड्यात 102 रुपयांनी वाढ करण्यात आली होती

दैनिक गोमन्तक

देशात पुन्हा एकदा महागाईचा फटका जनतेला बसणार आहे. घरगुती एलपीजी (14.2 किलो) सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. शनिवारी एलपीजी गॅस सिलिंडर तेल कंपन्यांनी 50 रुपयांनी महाग केला आहे. यासह, आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 999.50 रुपयांवर गेली आहे. मार्च 2022 मध्येही सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्याच वेळी, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत गेल्या आठवड्यात 102 रुपयांनी वाढ करण्यात आली होती, त्यानंतर त्याची किंमत 2253 रुपये करण्यात आली होती. (LPG Price Hike)

सर्वसामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा सामना करत असताना एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. आता एलपीजीच्या वाढलेल्या किमतीही सर्वसामान्यांचा खिसा खाली करणार असं दिसत आहे. 1 मे रोजी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 102.50 रुपयांनी वाढवण्यात आली होती. त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 2355.50 रुपयांवर पोहोचली. त्याचबरोबर 5 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमतही 655 रुपयांवर पोहोचली आहे.

याआधी कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात 250 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 1 एप्रिलपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती 2,253 रुपये करण्यात आल्या. त्याच वेळी, 1 मार्च रोजी, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा 105 रुपयांनी वाढ करण्यात आली. देशातील सर्वसामान्य जनता सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे हैराण झाली आहे. दरम्यान, एलपीजी गॅस सिलिंडरची महागाई त्यांना आणखी रडवणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT