Hop Oxo Booking: स्वदेशी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक Hope Electric 5 सप्टेंबर रोजी Hope Oxo ही देशातील पहिली इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही इलेक्ट्रिक बाइक एका चार्जवर 140 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे आणि ही बाईक ताशी 90 किमी वेगाने धावू शकेल.
या बाईकचा लूक यामाहा एफझेड सारखा आहे. होपने या बाइकसाठी प्री-बुकिंग सुरू केले आहे, ज्यासाठी तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आणि ₹ 999 ची टोकन रक्कम जमा करावी लागेल. हॉप इलेक्ट्रिकने अलीकडेच या बाइकबद्दल एक नवीन टीझर रिलिज केला आहे.
Hop Oxo चा लुक
या नवीन इलेक्ट्रिक बाईकच्या मागील बाजूस ड्युअल शॉकर्स आणि पुढच्या भागात टेलिस्कोपिक सस्पेंशन आहे. याशिवाय, यात रियर ग्रॅब रेल आणि स्प्लिट सीट देखील मिळेल. या बाइकमध्ये एलईडी लाइटिंग आणि साइड टर्न इंडिकेटर देण्यात आले आहेत. त्याच्या दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक लावण्यात आले आहेत. टीझर पाहता या इलेक्ट्रिक बाईकमध्ये रियर हब मोटर देण्यात येणार असल्याचे कळते. या बाईकचा लूक यामाहा एफझेडच्या 150cc व्हर्जन सारखा आहे.
किंमत आणि फिचर्स
Hop Oxo इलेक्ट्रिक बाईक ड्युअल बॅटरी सेटअपसह सुसज्ज असू शकते. ही बाईक एका चार्जवर 140 किमीची रेंज देण्यास सक्षम असेल. ही बाईक कमाल 80 ते 90 किमी/तास वेगाने धावू शकणार आहे. Oxo ची संभाव्य एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.20 लाख रुपये असू शकते. हॉप इलेक्ट्रिक देखील बॅटरी स्वॅपिंग स्टेशनसाठी सज्ज आहे जे फक्त 20 सेकंदात बदलले जाऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.