PPF Saving Scheme Dainik Gomantak
अर्थविश्व

PPF Scheme मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनो सावधान! 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान

PPF Login: केंद्र सरकार लोकांच्या हितासाठी अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचा देखील समावेश आहे.

Manish Jadhav

PPF Login: केंद्र सरकार लोकांच्या हितासाठी अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचा देखील समावेश आहे.

पीपीएफ योजनेद्वारे लोकांना दीर्घकाळ गुंतवणूक करण्याची संधी मिळते. यासोबतच लोकांना हवे असल्यास ते दर महिन्याला काही रक्कम जमा करु शकतात.

तथापि, जर तुम्ही पीपीएफ योजनेत पैसेही गुंतवले तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो.

मॅच्युरिटी आणि व्याज

वास्तविक, पीपीएफ योजना ही दीर्घकालीन बचत आणि गुंतवणूक (Investment) योजना आहे. जर या योजनेत पैसे गुंतवले गेले तर त्याची मॅच्युरिटी 15 वर्षांनी होते. 15 वर्षानंतरच या योजनेत व्याजासह पैसे मिळतात.

मात्र, या 15 वर्षांत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्याचबरोबर या योजनेत लोकांना 7.1 टक्के दराने वार्षिक व्याज दिले जात आहे.

PPF खाते

जेव्हाही PPF योजनेत गुंतवणूक केली जाते तेव्हा एका आर्थिक वर्षात या योजनेत किमान 500 रुपये गुंतवणे फार महत्वाचे असते.

त्याचवेळी, एका आर्थिक वर्षात या योजनेत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, जर एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात या योजनेत किमान 500 रुपये देखील जमा करु शकत नसेल, तर पीपीएफ खाते निष्क्रिय होईल.

किमान गुंतवणूक

यानंतर, ते निष्क्रिय खाते पुन्हा सक्रिय करणे आवश्यक असेल, ज्यामध्ये काही रुपये दंड म्हणून भरावे लागतील.

याशिवाय, ज्या वर्षी तुम्ही किमान 500 रुपयांची गुंतवणूकही केली नाही, त्या वर्षी मिळालेल्या व्याजाच्या बाबतीत लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

अशा परिस्थितीत, लोकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, प्रत्येक आर्थिक वर्षात पीपीएफ खात्यात किमान गुंतवणूक केली पाहिजे जेणेकरुन पीपीएफ खाते निष्क्रिय होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT