Post Office Scheme Dainik Gomantak
अर्थविश्व

पोस्ट आॅफिसच्या 'या' योजनेत गुतंवणुक करून मिळवा 5000 रिटर्न

Post Office Scheme: पोस्ट आॅफिसच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

दैनिक गोमन्तक

पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून खूपच सुरक्षित मानल्या जातात. यामुळेच लोक या योजनेचा लाभ घातात. अधिक गुंतवणूक केल्यानंतर ते या लहान बचत योजनांचा लाभ घेऊ शकतात. सरकारच्या पाठिंब्यामुळे लोकांचा त्यांच्यावर अधिक विश्वास निर्माण झाला आहे. यासोबतच रिटर्नही त्यामध्ये निश्चित होऊ लागतात. त्यामुळे, यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला मॅच्‍योरिटीवर किती पैसे मिळणार आहेत हे माहीत असते. (post office scheme invest money news)

पोस्ट ऑफिस (Post Office) मासिक उत्पन्न योजना ही देखील अशीच एक योजना आहे ज्यामध्ये हमी परतावा दिला जातो. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत वार्षिक 6.6 टक्के व्याज मिळू लागते. ही योजना पाच वर्षांनी मॅच्‍योर होऊ लागते.

म्हणजेच 5 वर्षानंतर तुम्हाला मासिक उत्पन्नाची हमी मिळू लागते. पाच वर्षांनंतर आणखी पाच वर्षे मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. मॅच्युरिटीपूर्वी खातेदाराचा मृत्यू झाल्यास, पैसे नामांकित व्यक्तीला दिले जातात. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत, फक्त 1000 रुपयांमध्ये खाते उघडल्यानंतर लाभ दिला जात आहे.

* महिन्याला पाच हजार रुपये उत्पन्न मिळेल

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्किममध्ये 6.6 टक्के वार्षिक व्याज जमा होण्यास सुरुवात होते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने यामध्ये 9 लाख रुपयांची गुंतवणूक संयुक्त खात्यातून केली असेल, तर त्याला वार्षिक 6.6 टक्के दराने 59,400 रुपये दिले जात आहेत. एका महिन्याच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास ते 4,950 रुपये आहे. हे गुंतवणूकदाराला दर महिन्याला घ्यावे लागते. ही फक्त व्याजाची रक्कम आहे. गुंतवणूकदाराची (invest) मुद्दल तशीच राहणार आहे.

* किती गुंतवणूक करता येईल

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत, तुम्हाला सिंगल आणि जॉइंट दोन्ही खाती उघडून लाभ मिळत आहे. यामध्ये एक व्यक्ती एका खात्यात जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवल्यानंतर लाभ घेऊ शकते. कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो ज्याचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT