Post Office Dainik Gomantak
अर्थविश्व

Post Office: पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवणूक करणाऱ्यांना लागली लॉटरी, जाणून घ्या

Post Office Scheme Update: पोस्ट ऑफिस द्वारे अनेक विशेष योजना चालवल्या जातात, ज्या अंतर्गत तुम्हाला मोठा लाभ मिळतो.

दैनिक गोमन्तक

Post Office Scheme Update: पोस्ट ऑफिस द्वारे अनेक विशेष योजना चालवल्या जातात, ज्या अंतर्गत तुम्हाला मोठा लाभ मिळतो. आज आम्ही तुम्हाला अशा सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुमचे पैसे दुप्पट होतील. होय... तुम्ही या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये 5 लाखांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्या बदल्यात पूर्ण 10 लाख मिळतील.

दरम्यान, या योजनेचे नाव किसान विकास पत्र आहे, ज्यामध्ये तुम्हाला दुप्पट पैसे मिळतात. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठा परतावा मिळू शकतो. या योजनेत, तुमची रक्कम केवळ 123 महिन्यांत दुप्पट होईल. पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) जाऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. यासोबतच तुम्ही संयुक्त खातेही उघडू शकता. सध्या या योजनेवर गुंतवणूकदारांना 6.9 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळत आहे.

तसेच, जर तुम्ही स्टेट बँकेत एफडी केली, तर गुंतवणूकदारांना 6.25 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळत आहे. दुसरीकडे, तुम्ही 5 ते 10 वर्षांसाठी मुदत ठेव ठेवल्यास, तुम्हाला 6.90 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळतो. या योजनेत तुम्ही किमान रु 1,000 च्या गुंतवणुकीपासून (Investment) सुरुवात करु शकता. त्याचवेळी, या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही.

शिवाय, जर तुम्ही या योजनेत 123 महिन्यांसाठी 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला या योजनेवर 6.9 टक्के दराने व्याज मिळेल. म्हणजेच, मॅच्युरिटीवर मूळ रकमेसह, तुम्हाला व्याजाचा लाभ देखील मिळेल. केंद्र सरकारच्या वतीने या योजनेत व्याजाचा लाभ तिमाही आधारावर दिला जातो. दुसरीकडे, जर गुंतवणुकीदरम्यान व्याजदरात बदल झाला तर तुम्हाला कमी किंवा जास्त फायदा मिळू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT