PNB  Dainik Gomantak
अर्थविश्व

PNB ग्राहकांचे बल्ले-बल्ले, बँकेने केली मोठी घोषणा; ऐकून तुम्हीही म्हणाल...

Punjab National Bank Latest News: विशेष म्हणजे, फक्त 600 दिवसात तुम्हाला मोठा फायदा होणार आहे.

दैनिक गोमन्तक

PNB FD Interest Rates: पंजाब नॅशनल बँकेत (PNB Account) खाते असलेल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हीही फिक्स्ड डिपॉझिटचे व्याजदर मिळवण्याचा विचार करत असाल, तर आता PNB तुमच्यासाठी खास FD (PNB Fd) घेऊन आले आहे, ज्यामध्ये तुम्हाला खूप मोठे फायदे मिळतील. विशेष म्हणजे, फक्त 600 दिवसात तुम्हाला मोठा फायदा होणार आहे.

पीएनबीने ट्विट केले

पीएनबीने आपल्या अधिकृत ट्विटवर याबाबत माहिती दिली आहे. पीएनबीने ट्विटमध्ये म्हटले की, 'जेव्हा तुम्हाला गुंतवणुकीवर (Investment) चांगले व्याज मिळेल, तेव्हा बचत आपोआप वाढेल. PNB ने ग्राहकांसाठी (Customers) 600 दिवसांची खास योजना आणली आहे.'

भरघोस व्याज मिळेल

PNB ची 600 दिवसांची योजना 7.85 टक्के दराने व्याजाचा लाभ देते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पीएनबी वन अ‍ॅपद्वारे अर्ज करु शकता. याशिवाय बँकेच्या शाखेत जाऊनही तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.

काय आहे या योजनेचे वैशिष्ट्य-

>> बँकेची ही विशेष योजना 19 ऑक्टोबर 2022 पासून सुरु झाली आहे.

>> ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी (60-80 वर्षे) आहे.

>> याशिवाय अती ज्येष्ठ नागरिक (80 वर्षे आणि त्यावरील) देखील याचा लाभ घेऊ शकतात.

>> या अंतर्गत दोन कोटी रुपयांपेक्षा कमी एकरकमी रक्कम जमा करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: पैसा खळाळणार! त्रिपुष्कर योग ठरणार फलदायी; 'या' 5 राशींचे दिवस बदलणार

Goa Accident: डिचोलीत भीषण अपघात! बगलमार्गावर व्हाळशी जंक्शनजवळ वाहनाची झाडाला जोरदार धडक; कर्नाटकातील तिघे गंभीर जखमी

Chorao Ferryboat: निष्काळजीपणामुळे बुडाली होती 'बेती फेरीबोट'! चोडण दुर्घटनेबाबत बंदर कप्तान खात्याचा अहवाल सादर

Mapusa Fish Market: 'म्हापसेकरांना आणखी संकटात लोटू नये'! म्हापसा पालिकेला मासळी मार्केट अस्वच्छतेवर नोटीस; काँग्रेस करणार स्वच्छता

Shelvan Jetty: '..गावात जेटी होऊ देणार नाही'! शेळवण-कुडचडेवासीयांचा निर्धार; आमदार काब्राल यांची घेतली भेट

SCROLL FOR NEXT