PM Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

BSNL बाबत सरकारची मोठी घोषणा! या दिवशी होणार कंपनीचे विलीनीकरण; PM मोदींनी दिली मंजूरी

BSNL-BBNL Merger: BSNL च्या विलीनीकरणाबाबत ताजे अपडेट आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएलच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

BSNL-BBNL Merger: BSNL च्या विलीनीकरणाबाबत ताजे अपडेट आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएलच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या पुनरुज्जीवनासाठी 1.64 लाख कोटी रुपयांचे रिवाइवल पॅकेज मंजूर करण्यात आले. म्हणजेच, आता लवकरच बीएसएनएलचे विलीनीकरण होणार आहे. याबाबतची माहिती सरकारने दिली आहे. नवीन अपडेट जाणून घेऊया...

केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 'बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारने 1,64,156 कोटी रुपयांचे रिवाइवल पॅकेज मंजूर केले आहे. मंत्रिमंडळाने भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL) यांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली. BSLN चे BBNL मध्ये विलीनीकरण झाल्याने ग्राहकांना (Customers) देखील फायदा होईल.'

काय परिणाम होणार?

आता यातून तुम्हाला काय मिळणार हा प्रश्न आहे. या विलीनीकरणामुळे आता देशभरात पसरलेल्या BBNL च्या 5.67 लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबरचे संपूर्ण नियंत्रण BSNL च्या हातात येईल. यासाठी सरकार येत्या तीन वर्षांत बीएसएनएलसाठी 23,000 कोटी रुपयांचे रोखे जारी करणार आहे.

त्याचवेळी, सरकार (Government) एमटीएनएलसाठी 2 वर्षांत 17,500 कोटी रुपयांचे रोखे जारी करेल. केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, 'बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारने 1,64,156 कोटी रुपयांचे रिवाइवल पॅकेज मंजूर केले आहे. यामुळे टेलिकॉम कंपनीला 4G वर अपग्रेड करण्यात मदत होईल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

Sattari water Isuue: दूषित पाणीप्रकरणी आयोग सक्रिय; सत्तरीत स्वतःहून चौकशी, संबंधित विभागांना नोटीस

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

SCROLL FOR NEXT