2000 Rupees Note: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली. 'क्लीन नोट पॉलिसी' अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला. ही मोठी नोट बंद करण्याचा निर्णय अखेर पाच वर्षांतच का घ्यावा लागला?
याबाबत अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे मात्र, पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, पंतप्रधान मोदींना 2000 ची नोट अजिबात आणायची नव्हती.
ते पुढे म्हणाले की, '2016 मध्ये नोटाबंदीनंतर पंतप्रधानांना एवढी मोठी नोट बाजारात यावी असे वाटत नव्हते, परंतु शॉर्ट टर्म मूव्ह म्हणून ती जारी करावी लागली.'
नोटाबंदीच्या वेळी नृपेंद्र मिश्रा हे पंतप्रधानांचे प्रधान सचिव होते. ते पुढे असेही म्हणाले की, '2000 रुपयांची नोट दैनंदिन व्यवहारासाठी योग्य नाही, असे पंतप्रधान मोदींचे मत होते.
याशिवाय, काळा पैसा आणि करचुकवेगिरीलाही प्रोत्साहन मिळू शकते. कमी किमतीच्या नोटा बाजारात याव्यात म्हणजे लोकांची सोय होईल, अशी त्यांची इच्छा होती.'
आरबीआयने (RBI) यापूर्वीच 2 हजारांच्या नोटांची छपाई कमी केली होती. यानंतर लोकांकडे फक्त दोन हजाराच्या नोटा उरल्या होत्या. एटीएममधून दोन हजाराच्या नोटाही निघत नव्हत्या.
या नोटांचे चलन आधी कमी करण्यात आले आणि आता 30 सप्टेंबर 2023 पासून त्या पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिश्रा म्हणाले की, "आरबीआयचे हे पाऊल नोटाबंदीसारखे नसून ती एक नियमित प्रक्रिया आहे."
मिश्रा पुढे म्हणाले की, 'दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने पंतप्रधान मोदींचा मॉड्युलर बिल्डिंग दृष्टिकोन दिसून येतो. 2018-29 मध्येच त्याची छपाई थांबवण्यात आली होती.
500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर ही नोट बाजारात आली. 500, 200 आणि 100 च्या नोटा बाजारात (Market) आल्यावर या नोटा कमी झाल्या.'
वित्त सचिव टी सोमनाथन म्हणाले की, 'हा नोटाबंदीसारखा निर्णय नाही आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.