PM Narendra Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Scheme: PM मोदींनी 8 कोटी शेतकऱ्यांना दिली आनंदाची बातमी... जारी केला 15 वा हप्ता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेंतर्गत 15 वा हप्ता जारी केला आहे.

Manish Jadhav

PM Kisan Scheme: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेंतर्गत 15 वा हप्ता जारी केला आहे. किसान योजनेंतर्गत पीएम मोदींनी DBT मधून 18,000 कोटी रुपयांची रक्कम कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली आहे.

झारखंडमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान, पीएम मोदींनी डीबीटीद्वारे सुमारे 8 कोटी शेतकऱ्यांना 18,000 कोटी रुपये हस्तांतरित केले.

यापूर्वी, 14 वा हप्ता मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी 8 कोटी 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 17 हजार कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. 13 व्या हप्त्यातर्गंत, पीएम मोदींनी सुमारे 16,800 कोटी रुपये वितरित केले होते.

करोडो शेतकऱ्यांना 15 वा हप्ता मिळाला नाही

दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यापूर्वीच पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याची माहिती दिली होती. ट्विटद्वारे दिलेल्या माहितीत त्यांनी 15 नोव्हेंबरला डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील, असे सांगितले होते.

यावेळीही केंद्र सरकारने अनेक अपात्र शेतकऱ्यांची (Farmers) नावे यादीतून वगळली आहेत. यावेळीही कोट्यवधी शेतकऱ्यांना पीएम किसान निधीचा 15 वा हप्ता मिळालेला नाही. ज्या शेतकऱ्यांची खाती वेगवेगळ्या पोर्टलशी लिंक नाहीत, त्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत, असे सरकारकडून आधीच सांगण्यात आले होते. भुलेख पडताळणी आणि आधार सीडिंग देखील आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये मिळतात

दुसरीकडे, आधार सीडिंग केलेल्या शेतकऱ्यांनाच सरकार (Government) 15 वा हप्ता देणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने सुरु केलेल्या PM किसान निधी अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. हे तीन हप्त्यांमध्ये दिले जातात.

या अंतर्गत दर चार महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. काही अपात्र शेतकरी शासकीय योजनेचा लाभ घेत असल्याचा अहवाल नुकताच सरकारला प्राप्त झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Market: म्हापसा मार्केटचा पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लागणार, 3 टप्प्यांत चालना; 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित

Goa Youth Festival: पणजीत युवा महोत्सव, 1 ते 2 डिसेंबर रोजी कला अकादमीत आयोजन; 10 हजार तरुण सहभागी होणार

Tiger Reserve Controversy: नेत्रावळीतील समस्‍या कधी सोडविल्‍या का? व्‍याघ्र प्रकल्‍पावरून केवळ निर्बंध थोपवले; वास्‍तव तपासा, ग्रामस्‍थांची मागणी

Shriram Digvijay Yatra: श्रीराम दिग्विजय यात्रेचे पर्तगाळी मठात आगमन, आतषबाजीने रथाचे स्वागत; मठानुयायी, भाविकांत उत्साहाचे वातावरण

PM Narendra Modi Goa visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गोव्यात; श्रीरामांच्या मूर्तीचं करणार अनावरण, लोटणार भक्तांचा 'पूर'; भव्य कार्यक्रमांचे आयोजन

SCROLL FOR NEXT