Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी PM मोदींची मोठी घोषणा! कृषी शास्त्रज्ञांना केले 'हे' आवाहन

PM Kisan Nidhi: केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी सातत्याने काम करत आहे.

Manish Jadhav

PM Kisan Nidhi: केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी सातत्याने काम करत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

त्यासाठी PM किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) आणि प्रधानमंत्री किसान फसल विमा योजना (PMKFY) इत्यादी देशभरात लागू करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सातत्याने मिळत आहे.

शनिवारी एका कार्यक्रमात पीएम मोदी म्हणाले की, भरड धान्य सुरक्षा तसेच खाद्य सवयींशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी या योजना उपयुक्त ठरु शकतात.

भारताच्या प्रस्तावावर हे काम करण्यात आले

पंतप्रधान मोदींनी कृषी शास्त्रज्ञांना देशाच्या खाद्य बास्केटमध्ये या पौष्टिक धान्यांचा वाटा वाढवण्याच्या दिशेने काम करण्याचे आवाहन केले.

'वैश्विक श्री अन्न सम्मेलन'च्या उद्घाटनानंतर एका मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या (India) प्रस्तावानंतर आणि प्रयत्नांनंतर संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे 'आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष' म्हणून घोषित केले ही देशासाठी सन्मानाची बाब आहे.

2.5 कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे

भरडधान्याला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी भारत सातत्याने प्रयत्न करत असल्याचे मोदी म्हणाले. प्रतिकूल हवामानात आणि रसायने, खतांचा वापर न करता बाजरीचे उत्पादन सहज करता येते, असेही ते म्हणाले.

भारताच्या भरडधान्य मिशनमुळे 2.5 कोटी लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना फायदा होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, 'आज राष्ट्रीय खाद्य बास्केटमध्ये भरड धान्याचा वाटा केवळ पाच-सहा टक्के आहे. हा वाटा वाढवण्यासाठी मी भारतातील शास्त्रज्ञ (Scientist) आणि कृषी तज्ज्ञांना त्वरीत काम करण्याची विनंती करतो. त्यासाठी आपल्याला साध्य करता येणारी उद्दिष्टे निश्चित करायची आहेत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT