PM Kisan Scheme Latest News Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Yojana: 'या' शेतकऱ्यांना पुढच्या हप्त्यात 2 हजारांऐवजी 4 हजार मिळणार? वाचा

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा देशातील 10 कोटींहून अधिक शेतकरी सध्या लाभ घेत आहेत.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) ही केंद्र सरकारची (Central Government) महत्त्वाकांक्षी योजना आहे म्हणायला हरकत नाही. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा देशातील 10 कोटींहून अधिक शेतकरी सध्या लाभ घेत आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत शासनाने शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचे 11 हप्ते दिले आहेत तर आता सरकार लवकरच 12 वा हप्ता देखील देणार आहे. (PM Kisan Yojana These farmers will get 4 thousand instead of 2 thousand in the next installment)

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. मात्र, सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाहीये. 11व्या हप्त्याचे पैसे सरकारने 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले होते. या योजनेंतर्गत सरकार एका वर्षात शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये देत असते.

दोन हप्त्यांमध्ये पैसे येऊ शकतात

देशातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 11व्या हप्त्याचे पैसे अध्याप आलेले नाहीत मात्र याची अनेक कारणे होती. ज्या शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे बरोबर आहेत, त्या शेतकऱ्यांना आता 12 व्या हप्त्यासोबत 11 व्या हप्त्याचे पैसे मिळू शकणार आबेत. अशाप्रकारे, यावेळी सरकार त्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांऐवजी 4 हजार रुपये टाकू शकते असे सांगण्यात येत आहे.

शेतकऱ्यांचा हप्ता थांबवण्याची अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, पीएम किसान योजनेत नोंदणी करताना, कोणतीही माहिती भरण्यात चूक करणे, तुमचा पत्ता किंवा बँक खात्याची माहिती देखील चुकीची असू शकते. याशिवाय राज्य सरकारकडून दुरुस्ती प्रलंबित असतानाही पैसे तुमच्या खात्यावर येणार नाहीत. याशिवाय, आधार सीडिंग नसल्यास, सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) रेकॉर्ड स्वीकारत नसल्यास किंवा बँकेची रक्कम अवैध असल्यास NPCI मध्ये देखील तुमचे पैसे अडकू शकतात. तसेच तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल.

सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा, येथे तुम्हाला उजव्या बाजूला फॉर्मर कॉर्नर लिहिलेलं दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर लाभार्थी स्थितीवरती क्लिक करा. असे केल्याने, तुम्हाला आधार क्रमांक, खाते क्रमांक आणि फोन नंबरचा पर्याय दिसून येईल. आधार क्रमांक टाका आणि गेट डेटा वरती क्लिक करा. असे केल्याने, येथे तुमची सर्व माहिती आणि तुम्हाला मिळालेल्या पीएम किसानच्या हप्त्यांचा तपशील समोर येईल आणि तुम्ही दिलेली सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते येथे तपासा. जर काही माहिती चुकीची असेल तर तुम्ही ती तिथेच दुरुस्त करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

SCROLL FOR NEXT