PM Kisan
PM Kisan Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan चा 13 वा हप्ता आला नाही, तर या नंबरवर लगेच कॉल करा!

Manish Jadhav

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता केंद्र सरकारने नुकताच जारी केला आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांना अद्याप त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 16,400 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे.

जर तुम्ही देखील या योजनेशी संबंधित असाल आणि हप्ता जारी झाल्यानंतर 5 दिवसांनंतरही तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत. त्यामुळे तुम्ही हेल्पलाइन नंबरवर कॉल करुन तक्रार करु शकता.

पीएम किसान (PM Kisan) सन्मान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी, तुम्ही हेल्पलाइन नंबरवर कॉल करु शकता किंवा ईमेलवर तुमची तक्रार पाठवू शकता.

पीएम किसान योजना म्हणजे काय?

शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक मदत करण्यासाठी आणि त्यांची स्थिती सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi) लागू केली आहे.

या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात, या पैशातून शेतकरी आपली शेती सुधारु शकतात आणि आपली आर्थिक स्थिती मजबूत करु शकतात.

असे जाणून घ्या तुम्हाला पैसे मिळाले की नाही?

1. तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर (pmkisan.gov.in) जावे लागेल.

2. यानंतर दिलेल्या 'फार्मर्स कॉर्नर' टॅबवर क्लिक करा.

3. यानंतर Former Corner अंतर्गत (लाभार्थी स्थिती) वर क्लिक करा.

4. नंतर तुमच्याकडून काही डिटेल्स विचारले जातील, ते तुम्हाला भरावे लागतील.

5. यानंतर 'Get Data' वर क्लिक केल्यावर हप्त्याचे स्टेटस येईल.

6. तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल. तुम्हाला पैसे मिळाले की नाही.

या क्रमांकावर आणि ईमेल आयडीवर तक्रार करा

जर तुम्ही देखील या योजनेशी संबंधित असाल आणि हप्ता जारी झाल्यानंतर 5 दिवसांनंतरही तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

तुम्ही तुमचे प्रश्न पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर (पीएम किसान हेल्पलाइन) – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तुम्ही ई-मेल आयडीद्वारेही संपर्क करु शकता. तुमची तक्रार (pmkisan-ict@gov.in) वर मेल करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT