PM Kisan Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Scheme: करोडो शेतकऱ्यांची होणार निराशा, पीएम किसानचा 14 वा हप्ता मिळणार नाही? सरकारचे ट्विट व्हायरल

PM Kisan Update: तुम्हीही तुमच्या 2000 रुपयांची (2k रुपये) वाट पाहत असाल, तर सरकारकडून तुमच्यासाठी एक मोठी अपडेट जारी करण्यात आले आहे.

Manish Jadhav

PM Kisan Scheme 14th Installment: देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी (PM Kisan) एक मोठी बातमी आहे. यावेळी देशातील शेतकरी 14 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

तुम्हीही तुमच्या 2000 रुपयांची (2k रुपये) वाट पाहत असाल, तर सरकारकडून तुमच्यासाठी एक मोठी अपडेट जारी करण्यात आले आहे. पीएम किसान योजनेच्या अधिकृत ट्विटवर या अपडेटची माहिती देण्यात आली आहे.

तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर जाणून घ्या. सरकारने जारी केलेल्या अपडेटचा कोट्यावधी लोकांवर परिणाम होणार आहे.

सरकारने ट्विट केले

पीएम किसान योजनेने अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी (Farmer) त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करावे आणि पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट http://pmkisan.gov.in वर त्यांचे ई-केवायसी सबमिट करावे.

PM किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी -

>> तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करा

>> बँक खाते स्थितीसह तुमचे आधार सीडिंग तपासा

>> तुमच्या आधार सीडेड बँक खात्यामध्ये तुमचा DBT पर्याय सक्रिय करा

>> तुमचे ई-केवायसी पूर्ण करा

>> पीएम किसान पोर्टलमध्ये तुमचे स्टेटस मॉड्यूल Know Your Status अंतर्गंत तुमचे आधार सीडिंग स्टेटस तपासा

ई-केवायसी ऑनलाइन करता येते

पीएम किसान (PM Kisan) वेबसाइटनुसार, पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. केवायसी ऑनलाइन करायचे असल्यास, ओटीपी आधारित ईकेवायसी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे. शेतकरी बायोमेट्रिक आधारित केवायसी देखील करु शकतात.

यासाठी बायोमेट्रिक आधारित केवायसीसाठी सीएससी केंद्रांना भेट देऊन केवायसी करता येईल. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याचा लाभ हवा असेल, तर लवकरच केवायसी करा.

तुमच्या हप्त्याचे स्टेटस तपासा-

>> हप्त्याचे स्टेटस पाहण्यासाठी तुम्ही पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.

>> आता Farmers Corner वर क्लिक करा.

>> आता Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.

>> आता तुमच्यासोबत एक नवीन पेज उघडेल.

>> येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.

>> यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिम भारतात? UNच्या रिपोर्टवर भारताचा तीव्र आक्षेप, कडक शब्दात ताकीद देत केला थेट सवाल

North Goa Final Voter List: उत्तर गोव्याची अंतिम मतदारयादी 4 जानेवारीला; वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याची संधी

Bhuvneshwar Kumar World Record: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात कमबॅक! तब्बल 1,430 दिवसांनंतर केली गोलंदाजी, पहिल्याच 2 चेंडूंवर नोंदवला विश्वविक्रम

Goa Under 23 Cricket: दिशांक मिस्कीनची एकाकी झुंज! नाबाद 97 धावांसह गोव्याला बिहारविरुद्ध विजयाची संधी

Ranji Trophy 2026: 40 पैकी 38 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या; गोव्याच्या फलंदाजांची रणजीत दयनीय अवस्था

SCROLL FOR NEXT