Narendra Singh Tomar Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेत मिळणारी रक्कम वाढणार? कृषीमंत्र्यांनी दिले उत्तर

PM Kisan: पीएम किसान सन्मान निधीचाही समावेश आहे. या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबांना सरकारकडून वर्षभरात 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

Manish Jadhav

PM Kisan Scheme: केंद्र सरकारकडून देशात अनेक योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांमध्ये देशातील विविध घटकांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर शासनाकडून शेतकऱ्यांसाठीही अनेक योजना राबविण्यात येतात.

यामध्ये पीएम किसान सन्मान निधीचाही समावेश आहे. या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबांना सरकारकडून वर्षभरात 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, आता पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत मिळणारी रक्कम वाढू शकती अशी चर्चा आहे.

पीएम किसान योजना

PM-KISAN योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु करण्यात आली. डिसेंबर 2018 पासून त्याची अंमलबजावणी झाली असली तरी. योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना (Farmers) दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्ष 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते.

हे उत्तर दिले

दुसरीकडे, पीएम किसान (PM Kisan) सन्मान निधी अंतर्गत मिळणार्‍या रकमेत वाढ करण्याच्या मुद्द्यावर, सरकारने अलीकडेच संसदेत माहिती दिली आहे की, 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) अंतर्गत प्रति लाभार्थी 6,000 रुपये वाढवण्याची कोणतीही योजना नाही. कोणतीही ऑफर नाही.' कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत आपल्या लेखी उत्तरात सांगितले की, 'सध्या असा कोणताही प्रस्ताव नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

SCROLL FOR NEXT