PM Kisan Nidhi Yojana Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता मिळणार दुप्पट पैसे; सरकारने...

PM Kisan Scheme Big Update: पीएम किसान योजनेंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये वर्ग करते.

Manish Jadhav

PM Kisan Scheme Big Update: देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. जर तुम्हीही पीएम किसान योजनेत नोंदणी केली असेल, तर 14 व्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

यावेळी, देशभरातील शेतकरी 14 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. पीएम किसान योजनेंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये वर्ग करते.

पुढचा हप्ता कधी येऊ शकतो?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार (Government) 14व्या हप्त्याचे पैसे मे किंवा जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करु शकते. यासोबतच बातम्या येत आहेत की, 14व्या हप्त्यात सरकार मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळू शकते.

अनेक शेतकऱ्यांना तेराव्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत

योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यावर वर्षातून तीनदा म्हणजे 4-4 महिन्यांच्या अंतराने पाठवले जातात. 13 वा हप्ता शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात मिळाला होता, अशा परिस्थितीत पुढील हप्ता जूनमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येईल, असा विश्वास आहे.

आता ज्यांना तेराव्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत, त्यांच्या खात्यासंबंधी काही समस्या आहे. अशा परिस्थितीत त्यांनी ती सुधारणा आधी करुन घ्यावी, अन्यथा भविष्यात ते या योजनेच्या लाभापासून वंचित राहतील.

eKYC करुन घ्या

पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांना लाभ मिळवण्यासाठी ई-केआयसी अनिवार्यपणे करणे आवश्यक आहे.

योजनेत नोंदणी करताना काही माहिती चुकली असेल, तर तीही लवकर दुरुस्त करावी. असे झाल्यानंतर त्यांना योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे हे लक्षात ठेवा. असे झाले नाही तरी तुम्ही लाभांपासून वंचित राहू शकता.

या क्रमांकांवर तुम्ही तक्रार करु शकता

तुम्हाला या योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर मेल करुन तुमची समस्या सांगू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''आशिष नेहराच्या कॉटेजला पंचायतीची परवानगी नाही'' केळशी ग्रामसभेत वादळी चर्चा

Salcette: पॉप्युलर हायस्कूलमध्ये 'चतुर्थीचा बाजार'; विद्यार्थ्यांडून सजावट, माटोळी साहित्याची विक्री

Goa Live News: "गोव्यातील माटोळी विक्रेत्यांकडून सोपो वसूल करू नये" मुख्यमंत्री

Sanquelim Road Issue: देसाईनगर साखळीतील रस्ता बनला धोकादायक; तातडीने डागडुजीची करण्याची रहिवाशांची मागणी

Panjim: मांडवी किनाऱ्यावरील अष्टमीच्या फेरीला जत्रेचे स्वरूप, सुटीमुळे खरेदीसाठी उडाली झुंबड

SCROLL FOR NEXT