PM Kisan Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Scheme: पीएम किसानचा 14 वा हप्ता पुढच्या महिन्यात येणार, तारीख जाहीर; पीएम मोदी...!

PM Kisan Scheme 14th Installment Date: केंद्र सरकार लवकरच देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील हप्त्याचे पैसे जमा करु शकते.

Manish Jadhav

PM Kisan Scheme 14th Installment Date: केंद्र सरकार लवकरच देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील हप्त्याचे पैसे जमा करु शकते. पुढील महिन्यात सरकार शेतकऱ्यांना 2000 रुपयांची भेट देऊ शकते.

देशभरातील शेतकरी 14 व्या हप्त्याची (PM Kisan Yojana) वाट पाहत आहेत. पीएम मोदींनी 26 फेब्रुवारी रोजी 13 वा हप्ता जारी केला, ज्या अंतर्गत सुमारे 16,800 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले होते.

23 जून रोजी पैसे येऊ शकतात

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार पीएम किसानच्या (PM Kisan) पुढील हप्त्यासाठी जून महिन्यात पैसे हस्तांतरित करु शकते. यावेळी 23 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता येऊ शकतो, अशी बातमी येत आहे. 14 व्या हप्त्याचे पैसे एप्रिल ते जुलै दरम्यान हस्तांतरित केले जातील.

30 मे पासून जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे

भाजप 30 मे पासून जनसंपर्क मोहीम राबवत आहे, ज्यामध्ये पीएम मोदी देखील संबोधित करणार आहेत. परंतु हे संबोधन कोणत्या तारखेला होणार हे अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान, सरकार (Government) पीएम किसानचे पैसे देखील हस्तांतरित करु शकते.

तुमच्या स्टेटसचे स्थिती तपासा-

>> हप्त्याचे स्टेटस पाहण्यासाठी तुम्ही पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.

>> आता Farmers Corner वर क्लिक करा.

>> आता Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.

>> आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.

>> येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.

>> यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

पीएम किसान केवायसी

पीएम किसान वेबसाइटनुसार, पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. केवायसी ऑनलाइन करायचे असल्यास, ओटीपी आधारित ईकेवायसी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे.

शेतकरी बायोमेट्रिक आधारित केवायसी देखील करु शकतात. यासाठी बायोमेट्रिक आधारित केवायसीसाठी सीएससी केंद्रांना भेट देऊन केवायसी करता येईल. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याचा लाभ हवा असेल, तर लवकरच केवायसी करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT