Farmer Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Scheme: करोडो शेतकर्‍यांना लागली लॉटरी, PM मोदी ट्रान्सफर करणार 4000 रुपये!

PM Kisan Scheme Update: केंद्र सरकार 2000 रुपयांचा 14वा हप्ता (PM Kisan 14th Installment) 27 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहे.

Manish Jadhav

PM Kisan Scheme Update: देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार 2000 रुपयांचा 14वा हप्ता (PM Kisan 14th Installment) 27 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहे. तब्बल साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे येणार आहेत.

17,000 कोटी रुपये ट्रान्सफर करणार

पंतप्रधान मोदी राजस्थानमधील सीकरमधून देशातील 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफरद्वारे सुमारे 17,000 कोटी रुपये पाठवणार आहेत. यानंतर ते 28 जुलै रोजी गुजरातमध्ये असतील.

4000 खात्यात येणार

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना आता दुप्पट लाभ मिळणार आहे. यापूर्वी 2000 रुपये ही रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांना ट्रान्सफर केली जात होती, परंतु यावेळी 2000 ऐवजी खात्यात 4000 रुपये येणार आहेत.

व्हेरिफिकेशनची प्रक्रिया

अनेक शेतकरी त्यांच्या व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करु शकले नाहीत, ज्यामुळे त्या शेतकऱ्यांना 13 व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत, परंतु आता मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी व्हेरिफिकेशन केले आहे. आता 14 व्या हप्त्यातच सरकार शेतकऱ्यांना 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये देणार आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांना तेराव्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत. त्या शेतकऱ्यांना तेराव्या हप्त्याचे पैसेही मिळतील.

13 व्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर करण्यात आले

पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याचे पैसे आतापर्यंत ट्रान्सफर करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने 6000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. सरकार हे पैसे 4 महिन्यांच्या अंतराने ट्रान्सफर करते. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हा पैसा शेतकऱ्यांना दिला जातो.

या क्रमांकांवर संपर्क साधू शकता

जर 13व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात अद्याप आले नाहीत, तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर मेल करुनही तुम्ही तुमची समस्या मांडू शकता. याशिवाय, पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी तुम्ही या क्रमांकांवर संपर्क साधू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT