PM Kisan Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: 12 कोटी शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट, जाणून घ्या कधी येणार 2000 रुपयांचा 14 वा हप्ता

PM Kisan 14th Installment: पीएम किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे.

Manish Jadhav

PM Kisan 14th Installment: पीएम किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. 27 फेब्रुवारी रोजी 13 व्या हप्त्याचे पैसे सरकारने 8.42 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले.

या हप्त्याचे पैसे खात्यात येऊन सुमारे दीड महिना पूर्ण होत असून, कोट्यवधी शेतकरी आता 14 वा हप्ता येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या योजनेंतर्गत मोदी सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात.

मे महिन्यात हप्त्याचे पैसे येणे अपेक्षित आहे

प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात. पीएम किसान निधीचा 14 वा हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान रिलीज होणार आहे.

13 व्या हप्त्यासाठी सरकारने बरीच प्रतीक्षा केली होती, असे तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत 14 व्या हप्त्यालाही विलंब होऊ शकतो.

हा हप्ता सरकारने (Government) गेल्या वर्षी मे महिन्यात जारी केला होता. यावेळीही 14 वा हप्ता मे महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित आहे. मात्र, याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

पीएम किसानसाठी नोंदणी कशी करावी

तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आणि तुम्ही अद्याप नोंदणी केली नसेल, तर तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन प्रकारे नोंदणी करु शकता.

यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या भागातील पटवारी (लेखपाल) किंवा पीएम किसान योजनेसाठी निवडलेल्या नोडल ऑफिसरकडे जावे लागेल.

येथे संबंधित फॉर्म भरुन तुमची कागदपत्रे सबमिट करा. याशिवाय, तुम्ही जवळच्या लोकसेवा केंद्राशी (CSC) संपर्क साधू शकता. या दरम्यान तुमची सर्व महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवा.

शेतकऱ्यांची शिधापत्रिका जमा करणे आवश्यक आहे

पीएम किसान (PM Kisan) निधीच्या पुढील हप्त्यासाठी शेतकऱ्यांचे शिधापत्रिका जमा करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला शिधापत्रिकेची हार्ड कॉपी जमा करावी लागणार नाही.

फक्त शिधापत्रिकेची PDF अपलोड करावी लागेल. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसानच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

शिधापत्रिकेची PDF फाईल तयार केल्यानंतर ती अपलोड करुन सबमिट करा. जर तुम्ही शिधापत्रिकेची प्रत जमा केली नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT