PM Kisan Scheme 13th Installment Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: करोडो शेतकऱ्यांचे बल्ले-बल्ले, 'या' दिवशी येणार खात्यात पैसे; सरकारने दिली माहिती!

PM Kisan Scheme 13th Installment Date 2023: देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी आहे.

Manish Jadhav

PM Kisan Scheme 13th Installment Date 2023: देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी आहे. तुम्हीही 13व्या हप्त्याची (PM Kisan Scheme) खूप दिवसांपासून वाट पाहत असाल तर आता तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. सरकारच्या वतीने ट्विट करुन पीएम किसानशी संबंधित मोठी अपडेट देण्यात आली आहे.

सरकारने ट्विट केले आहे

अ‍ॅग्रिकल्चर इंडियाने ट्विट करत म्हटले की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 11.37 कोटीहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. पीएम किसान योजनेंतर्गत, भारत सरकार लाभार्थी शेतकऱ्यांना (Farmer) प्रतिवर्ष रु.6000 ची आर्थिक मदत पुरवते.

होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान मोदी होळीपूर्वी देशातील करोडो शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा 13 वा हप्ता ट्रान्सफर करणार आहेत. म्हणजेच, होळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. यासोबतच सरकारने (Government) पुढे सांगितले आहे की, 'ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जाणार नाहीत.'

तुमच्या हप्त्याचे स्टेटस तपासा-

>> हप्त्याचे स्टेटस पाहण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा PM Kisan च्या वेबसाइटवर जा.

>> आता Farmers Corner वर क्लिक करा.

>> आता Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.

>> आता तुमच्यासोबत एक नवीन पेज उघडेल.

>> येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.

>> यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

पीएम किसानशी संबंधित या ठिकाणी तक्रारी करा

तुम्हाला या योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर मेल करुनही तुम्ही तुमची समस्या मांडू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

IND vs SA 2nd Test: केएल राहुलला टर्न समजलाच नाही, सायमन हार्मरच्या 'अविश्वसनीय' चेंडूवर त्रिफळाचीत! तुम्ही VIDEO पाहिला का?

Smriti Mandhana: 'तिला' स्विमिंगसाठी विचारलं! पलाश मुच्छलचे भलत्याच मुलीसोबत चॅट्स व्हायरल; क्रिकेटर स्मृतीला मोठा धक्का?

Goa News: ५६ व्या IFFI मध्ये विविध राज्यांच्या लोकनृत्यांचे दर्शन; कलाकारांनी मानले आभार

SCROLL FOR NEXT