PM Kisan Samman Nidhi Scheme Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan च्या 13व्या हप्त्यापूर्वी सरकारने केली मोठी घोषणा, ऐकून 14 कोटी शेतकरी खूश!

PM Kisan Samman Nidhi Scheme: देशातील 14 कोटी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत.

Manish Jadhav

PM Kisan Samman Nidhi Scheme: देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Scheme 13th Installment Date 2023) च्या 13व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे, ज्यानंतर देशातील 14 कोटी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत.

2.2 लाख कोटी निधी मिळाला

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

नुकताच सरकारने देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थसंकल्पात पीएम किसान सन्मान निधी योजनेत 2.2 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे.

अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान पैसे मिळतील

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम किसान योजनेंतर्गत मिळालेल्या निधीतून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अधिक निधी मिळाल्यास अधिक पात्र शेतकऱ्यांना (Farmer) लाभ मिळेल. देशभरात पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे.

होळीपूर्वी खात्यात पैसे येतील

यासोबतच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता या महिन्यात जारी केला जाऊ शकतो. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र होळीपूर्वीच पंतप्रधान किसान योजनेचे करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील, असे मानले जात आहे.

ई-केवायसी आवश्यक आहे

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही त्यांना 13व्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत. तुमची केवायसी अजून झाली नसेल, तर आजच पूर्ण करा, त्यामुळे तुम्हाला पैसेही मिळतील.

तुमच्या हप्त्याचे स्टेटस तपासा-

>> हप्त्याची स्थिती पाहण्यासाठी तुम्ही पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.

>> आता Farmers Corner वर क्लिक करा.

>> आता Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.

>> आता तुमच्यासोबत एक नवीन पेज उघडेल.

>> येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.

>> यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT