PM Kisan  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: PM किसानच्या 13 व्या हप्त्यापूर्वी आली मोठी बातमी, तुम्हीही म्हणाल...

PM Crop Insurance Scheme: पीएम किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

PM Crop Insurance Scheme: पीएम किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. आता देशभरातील 10 कोटींहून अधिक शेतकरी पीएम किसानच्या 13 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. डिसेंबर ते मार्च या कालावधीत हप्त्याची ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येणे आवश्यक आहे. मात्र याआधीच पंजाब सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

नुकसान पाच टक्क्यांपेक्षा जास्त नव्हते

ताज्या अपडेटनुसार, पंजाब सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) मंजूर केली आहे. इतर राज्यांप्रमाणे पंजाबमधील (Punjab) शेतकरीही (Farmer) पीकाचे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. तज्ज्ञांचे मते, यापूर्वी पंजाबमध्ये पिकांचे नुकसान पाच टक्क्यांपेक्षा जास्त नव्हते. मात्र गेल्या दोन वर्षांत कापूस आणि धान पिकाच्या नुकसानीत वाढ होऊन ते 15 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

पीक विमा योजना मंजूर करावी लागली

अशा परिस्थितीत पंजाब सरकारला प्रधानमंत्री फसल विमा योजनेला मंजुरी द्यावी लागली. कृषी विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांत व्हाइटफ्लाई हल्ल्यामुळे कापूस लागवडीचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने आत्तापर्यंत 700 कोटी रुपये खर्च केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

SCROLL FOR NEXT