Framer  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan च्या 13व्या हप्त्याचे पैसे आले नाहीत तर 'हे' काम ताबडतोब करा, अन्यथा...

PM Kisan Benefit: पीएम मोदींनी कर्नाटकातील बेलगावी येथे पीएम-किसान योजनेंतर्गत 16,000 कोटींहून अधिक रुपयांचा 13 वा हप्ता जारी केला.

Manish Jadhav

PM Kisan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan) आर्थिक मदतीसाठी पात्र असलेल्या करोडो शेतकऱ्यांना होळीपूर्वी होळीची भेट दिली आहे. पीएम मोदींनी कर्नाटकातील बेलगावी येथे पीएम-किसान योजनेंतर्गत 16,000 कोटींहून अधिक रुपयांचा 13वा हप्ता जारी केला.

अशा परिस्थितीत तुमच्या बँक (Bank) खात्यांमध्ये पीएम किसानचे पैसे आले आहेत की नाही ते तपासा. तुम्ही पात्र शेतकरी असाल आणि तरीही तुम्हाला पीएम-किसान योजनेचे पैसे मिळाले नाहीत, तर लगेच एक काम करा.

पीएम किसान

पीएम किसानचा 13 वा हप्ता जारी करताना पीएम मोदी म्हणाले की, "आज भारतातील (India) सर्व शेतकरी बेळगावी येथे जोडले गेले आहेत, येथून कोट्यवधी शेतकऱ्यांना 16 हजार कोटींहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. हा हप्ता होळीच्या शुभेच्छा आहे. "

पंतप्रधान पुढे म्हणाले की, 'पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 2.5 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. 50,000 कोटी रुपयांहून अधिक मदत, विशेषतः महिला शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्यात आली आहे.'

पीएम किसान योजना

ताज्या हप्त्यांतर्गत, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रुपये 2,000 जमा केले जातील, ज्याचा फायदा 8 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना होईल. योजनेतील 11वा आणि 12वा हप्ता गेल्या वर्षी मे आणि ऑक्टोबरमध्ये देण्यात आला होता.

या योजनेंतर्गत प्रत्येकी दोन हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर पाठवले जातात. त्याचबरोबर वर्षाला 6 हजार रुपयांची मदत दिली जाते.

किसान स्कीम

त्याचवेळी, तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीची रक्कम मिळेल की नाही, तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमचे नाव तपासू शकता. तिथे तुम्ही शेतकरी कॉर्नरवर क्लिक करुन लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासू शकता.

तसेच ई-केवायसी आणि जमिनीचे तपशील योग्यरित्या दिलेले आहेत का ते तपासा. आधार तपशील आणि बँक खाते तपशील देखील तपासा.

हे काम करा

जर सर्व तपशील बरोबर असतील पण तरीही PM किसान सन्मान निधीच्या 13 व्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात आली नसेल, तर कृषी मंत्रालयाशी त्वरित संपर्क साधून तुमची समस्या सांगता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli World Record: विराट कोहलीची अवघ्या 7 धावांची खेळी, पण रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडला! न्यूझीलंडविरुद्ध बनला नंबर 1 फलंदाज

VIDEO: डिचोलीत भीषण अपघात; जिममधून घरी परतताना दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, 22 वर्षीय तन्मयचा उपचारादरम्यान मृत्यू

Goa Pollution Control Board: धारबांदोड्यातील हॉटमिक्स प्रकल्प सुरू करण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीला आव्हान

Women’s T20: श्रेया परबची नाबाद 52 धावांची झुंज व्यर्थ; महाराष्ट्राने गोव्याला 12 धावांनी नमवले

Viral Video: मोबाईल ठेवायला जागा नाही म्हणून थेट चाकू बाहेर काढला! ट्रेनमधील तरुणाच्या कृत्याने प्रवासी संतप्त, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT