PM Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Janman Yojana: काय आहे प्रधानमंत्री जनमान योजना? PM मोदींनी जारी केला पहिला हप्ता

PM Janjati Adivasi Nyaya Maha Abhiyan: आज म्हणजेच 15 जानेवारी 2024 रोजी प्रधानमंत्री जनमान योजनेचा पहिला हप्ता जारी करण्यात आला.

Manish Jadhav

PM Janjati Adivasi Nyaya Maha Abhiyan: आज म्हणजेच 15 जानेवारी 2024 रोजी प्रधानमंत्री जनमान योजनेचा पहिला हप्ता जारी करण्यात आला. पंतप्रधान आदिवासी न्याय महाअभियानाची आजपासून सुरुवात झाली, ज्या अंतर्गत पंतप्रधान मोदींनी स्वतः सुमारे एक लाख लोकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे योजनेचा पहिला हप्ता दिला. ही योजना विशेषत: असुरक्षित आदिवासी गटांच्या विकासासाठी सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत या गटांचा आर्थिक आणि सामाजिक विकास केला जाणार आहे.

योजना आणि उद्दिष्ट काय आहे?

प्रधानमंत्री जनमान योजनेंतर्गत लोकांना घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. आदिवासी समाजातील लोकांना घरे उपलब्ध करुन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आदिवासींना घरांसह शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पोषण, वीज, रस्ते आणि दूरसंचार कनेक्टिव्हिटी आणि शाश्वत उपजीविका यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्याचा उद्देश आहे. योजनेअंतर्गत 4.90 लाख पक्की घरे देण्याची योजना आहे. एका घराची किंमत सुमारे 2.39 लाख रुपये आहे.

योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

आदिवासी समाजातील लोक, बहुसंख्य जमाती आणि वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना प्रधानमंत्री जनमान योजनेचा लाभ मिळणार आहे. देशभरातील 200 जिल्ह्यातील 22 हजार लोक या योजनेच्या कक्षेत येतील.

योजनेसाठी बजेट

प्रधानमंत्री जनमान योजनेचे बजेट सुमारे 24 कोटी रुपये आहे. या अंतर्गत 9 मंत्रालये एकत्र काम करतील. 2023-24 च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाभार्थ्यांना 20% निधी आणि 30% कर्ज मिळेल. 50 टक्के रक्कम सरकार देईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांना ग्रामपंचायत किंवा जिल्हा प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT