Pradhan Mantri Awas Yojana Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Awas Yojana: पंतप्रधान आवास योजनेबाबत सरकारची मोठी घोषणा ! ऐकून तुम्हीही म्हणाल...

PM Awas Yojana Update: तुम्हीही पीएम हाऊसिंगचे लाभार्थी असाल तर ही बातमी नक्की वाचा. पंतप्रधान आवास योजनेबाबत सरकारने मोठी घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

PM Awas Yojana: तुम्हीही पीएम हाऊसिंगचे लाभार्थी असाल तर ही बातमी नक्की वाचा. पंतप्रधान आवास योजनेबाबत सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर तुम्हा सर्वांना मोठा फायदा होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण (PMAY-G योजना) 2024 पर्यंत सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. नवीन अपडेट जाणून घेऊया.

पंतप्रधान आवास योजनेबाबत मोठी घोषणा

सरकारने पीएम आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 2.95 कोटी पक्की घरे देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आतापर्यंत सुमारे 2 कोटी पक्की घरे बांधण्यात आली आहेत. परंतु अजूनही अशी अनेक कुटुंबे या योजनेपासून वंचित आहेत, हे लक्षात घेऊन 2024 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. याचा फायदा लाखो ग्रामस्थांना होणार आहे.

सरकारने माहिती दिली

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेसाठी केंद्र सरकारचा एकूण खर्च 1,43,782 कोटी रुपये असेल आणि यामध्ये नाबार्डला कर्जाच्या व्याजाच्या भरणापोटी 18,676 कोटी रुपयांचा समावेश आहे. वास्तविक, या योजनेद्वारे, सरकार 90 टक्के आणि 10 टक्के या आधारावर पर्वतीय राज्यांनाही पैसे देते. तर उर्वरित केंद्र आणि राज्यांमध्ये 60 टक्के आणि 40 टक्के पेमेंट आहे. केंद्रशासित प्रदेशात असताना सरकार 100 टक्के पैसे खर्च करते.

शौचालय बनवण्यासाठीही पैसे उपलब्ध आहेत

विशेष म्हणजे, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत शौचालय बांधकामासाठी सरकार 12,000 रुपये देते, जे घराच्या बांधकामाव्यतिरिक्त दिले जाते. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला पक्की घरे, पाणी, वीज आणि शौचालये देण्याचा शासनाचा संकल्प पूर्ण होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI: रोहित शर्मासाठी वेलिंग्टन 'डेंजर झोन', खराब रेकॉर्ड चिंतेचा विषय; दुसऱ्या वनडेत इतिहास बदलण्याचे आव्हान

Andre Russell World Record: टी20 क्रिकेटचा 'बादशाह'! 10,000 धावा आणि 500 विकेट्स घेणारा आंद्रे रसेल ठरला जगातील पहिला खेळाडू; मोडले जुने वर्ल्ड रेकॉर्ड

Shukra Gochar: शुक्राची कृपादृष्टी अन् पैशांचा पाऊस! 6 ते 22 नोव्हेंबरचा काळ 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार छप्परफाड धनलाभ

Diwali Inflation Report 2026: दूध, तूप, ड्रायफ्रूट्सपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत... ऐन दिवाळीत महागाईचा झटका; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Illegal Hill Cutting: बांधकामाचा परवाना आहे, पण डोंगरकापणीची परवानगी कुठे? व्हिडीओ व्हायरल होताच तलाठ्यांची पाहणी; कारवाई मात्र अद्याप नाही!

SCROLL FOR NEXT