Piyush Goyal Dainik Gomantak
अर्थविश्व

Piyush Goyal: तीन सरकारी कंपन्यांच्या भवितव्याबाबत लवकरच होणार निर्णय! 'या' तारखेला सरकारची उच्चस्तरीय बैठक

Manish Jadhav

Piyush Goyal on MMTC Future: सरकारने गेल्या काही दिवसांत काही कंपन्यांची विक्री केल्यानंतर आता तीन कंपन्यांच्या भवितव्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.

मेटल अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एमएमटीसी), स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एसटीसी) आणि प्रोजेक्ट अँड इक्विपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (पीईसी) या तीन कंपन्यांबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

23 ऑक्टोबर रोजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत या कंपन्या बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असा दावा सूत्रांनी केला आहे.

कोणत्याही कॅनालायझिंग एजन्सीची गरज नाही

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने गेल्या वर्षी आयात-निर्यातीसाठी कॅनालायझिंग एजन्सी म्हणून रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने तीन कंपन्या बंद करण्याचा धोका कायम आहे.

ऑगस्ट महिन्यात, SEBI ने नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (NSEL) शी संबंधित प्रकरणात बेकायदेशीर 'पेअर कॉन्ट्रॅक्ट्स' मध्ये सहभागी झाल्यामुळे स्टॉक ब्रोकर म्हणून MMTC चा परवाना रद्द केला होता.

यापूर्वी, सरकारने (Government) या तीन सरकारी कंपन्यांच्या उपयुक्ततेबाबत जाणून घेतले होते. वाणिज्य विभागात कोणत्याही कॅनालायझिंग एजन्सीची गरज नाही, असे मानले जात होते.

मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, 'नॉन-स्ट्रॅटेजिक क्षेत्रातील CPSEs साठी सार्वजनिक विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन, MMTC, STC आणि PEC बंद करण्याचा विचार केला जात आहे.

हा प्रस्ताव विचाराधीन आहे. एमएमटीसी ही उच्च दर्जाची लोह खनिज, मॅंगनीज धातू, क्रोम धातू, कोप्रा आणि मौल्यवान धातूंच्या आयात आणि निर्यातीसाठी कॅनालायझिंग करणारी एजन्सी होती.

याशिवाय, गहू, डाळी, साखर आणि खाद्यतेल यांसारख्या मोठ्या प्रमाणात वापराच्या जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी एसटीसी ही कॅनालायझिंग संस्था होती. त्याचवेळी, PEC ही यंत्रसामग्री आणि रेल्वे उपकरणे निर्यात आणि आयात संबंधित एजन्सी होती.

एमएमटीसी आणि एसटीसीची सुरुवात अनुक्रमे 1963 आणि 1956 मध्ये झाली. पीईसी लिमिटेडची स्थापना 1971-72 मध्ये झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT