PM Kisan Tractor Yojana Dainik Gomantak
अर्थविश्व

'या' योजनेतर्गंत सरकार देतेय शेतकऱ्यांना अनुदान? कृषी मंत्रालयाने दिली महत्त्वाची अपडेट

Manish Jadhav

Modi Government Scheme: केंद्र सरकारकडून अनेक सरकारी योजना राबवण्यात येत आहेत. सध्या सोशल मीडियावर अनेक व्हायरल बातम्या येत आहेत. एका वेबसाइटवर दावा केला जात आहे की, कृषी मंत्रालयाकडून पीएम किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळत आहे.

ही बातमी पाहिल्यानंतर पीआयबीने फॅक्ट चेक केले, ज्यामध्ये या बातमीची सत्यता तपासण्यात आली. चला तर मग सरकार खरच शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देत आहे का ते जाणून घेऊया...

पीआयबीने ट्विट केले आहे

पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, बनावट वेबसाइटवर सरकार शेतकऱ्यांना (Farmers) ट्रॅक्टर अनुदानाची सुविधा देत असल्याचा दावा केला जात आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत कृषी मंत्रालयाकडून अनुदान दिले जात आहे.

ही वेबसाइट बनावट आहे

पीआयबी फॅक्ट चेकने ही वेबसाइट बनावट असल्याचे म्हटले आहे. शासनाकडून अशी कोणतीही योजना राबवली जात नाही. अॅग्रीकल्चर इंडियाने म्हटले आहे की, अशा कोणत्याही योजनेची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त सरकारच्या (Government) अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

फेक मेसेज कोणाशीही शेअर करु नका

केंद्र सरकारने पुढे म्हटले आहे की, असे मेसेज कोणाशीही शेअर करु नयेत. यासोबतच तुम्हाला सरकारशी संबंधित कोणत्याही योजनेची माहिती मिळवायची असेल तर तुम्ही केवळ अधिकृत वेबसाइटवर संपर्क साधावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Navratri 2024: छत्रपती शाहू महाराजांच्या सातारा दरबारातील सरदाराने गोव्यात बांधलेले एकमेव मंदिर

Rashi Bhavishya 5 October 2024: बिझनेसमध्ये धनप्राप्तीचा योग, पितृसुखाची छाया आणि खरेदीचा उत्तम संयोग; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Goa Crime News: पैशांसाठी मित्रांचा खून करणारा काजीदोनी दोषी; संशयिताची बाजू ऐकून कोर्ट ठोठावणार शिक्षा

Subhash Velingkar: 'वेलिंकरांना अटक करा, नाहीतर...'; संतप्त जमावाचा सरकारला अल्टिमेटम; डिचोलीत गुन्हा दाखल!

Delhi Drug Case: मोठा खुलासा! गोव्यामार्गे दिल्लीत पोहोचले ड्रग्ज; साडेपाच हजार कोटींच्या 562 किलो कोकेन‌ची तस्करी

SCROLL FOR NEXT