PhonePe users have to pay charges for add money in valet  Dainik Gomantak
अर्थविश्व

PhonePeयुजर्संना मोठा फटका,वॉलेटमध्ये पैसे ॲड करण्यासाठी द्यावा लागणार चार्जे

फोनपे (PhonePe) हे आज काल पेमेंट ट्रांसफरसाठी (Payment Transfer App) सर्वात जास्त वापरात येणारे अ‍ॅप्लिकेशन झाले आहे.

दैनिक गोमन्तक

फोनपे (PhonePe) हे आज काल पेमेंट ट्रांसफरसाठी (Payment Transfer App) सर्वात जास्त वापरात येणारे अ‍ॅप्लिकेशन झाले आहे.आपण सर्वजण सर्रासपणे फोन पेचा वापर करतो अनेक युजर्स क्रेडिट कार्डवरून (Credit Card) फोनपे वॉलेटमध्ये (PhonePe Vallet) पैसे टाकून छोटे -मोठे व्यवहार करतात. पण आता फोनपे वॉलेट वापसरणार्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण आता फोनपे (PhonePe) वापरणे महाग होणार आहे. (PhonePe users have to pay charges for add money in valet)

फोनपे (PhonePe) अ‍ॅपवर दिलेल्या माहितीनुसार, आता जर युजर्संनी क्रेडिट कार्डमधून फोनपे वॉलेटमध्ये 100 रुपये अ‍ॅड केले तर त्यांना 2.06 टक्के (जीएसटीसह) अतिरिक्त शुल्क भराव लागणार आहे . त्याचप्रमाणे, जर त्याने क्रेडिट कार्डद्वारे 200 रुपये जोडले तर त्याला 4.13 टक्के (जीएसटीसह) अतिरिक्त शुल्क आकारले जाईल . तसेच, दरम्यान, हा नियम नुकताच अंमलात आला आहे. मात्र, फोनपे वॉलेटमध्ये यूपीआय आणि डेबिट कार्डद्वारे पैसे अ‍ॅड करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.

पेमेंट ट्रान्सफरसाठी इतरही अ‍ॅप आहेत जे क्रेडिट कार्ड वरून जर तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये पेमेंट घ्यायची असेल तर तुम्हाला त्यावरही चार्जे आकारला जातोच मात्र यूपीआय आणि डेबिट कार्डद्वारे पैसे अ‍ॅड करण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही.

अलीकडेच, फोनपेने सांगितले होते की, कंपनीला जीवन विमा आणि सामान्य विमा उत्पादने विकण्यासाठी इरडाई (IRDA) कडून तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. कंपनीने म्हटले होते की, यासह ती आता आपल्या 300 दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांना विमा संबंधित सल्ला देऊ शकते. इरडाईने फोनपेला विमा ब्रोकिंग परवाना दिला आहे. आता फोनपे भारतातील सर्व विमा कंपन्यांची विमा उत्पादने विकू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant In Mumbai: "कामगारांचे कल्याण आणि सर्वांगीण विकासासाठी गोवा कटिबद्ध", 'OSH India 2025' मध्ये मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन

Goa Politics: "मंत्र्यांना सेवा नको, फक्त पैसा हवा...", मंत्री तवडकरांच्या नाराजीवरुन गिरीश चोडणकरांचा सरकारला टोला

Sam Konstas Century: कसोटी सामन्यात 'वनडे'चा तडका! बुमराहशी पंगा घेणाऱ्या पठ्ठ्यानं ठोकलं तूफानी शतक; भारतीय गोलंदाज हवालदिल

India vs Pakistan: लायकीवर उतरला पाकिस्तानी खेळाडू! सूर्यकुमार यादवला दिली शिवी; म्हणाला, "भारताला लाज वाटली पाहिजे" Watch Video

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

SCROLL FOR NEXT