पेट्रोल दरात पुन्हा वाढ  Dainik Gomantak
अर्थविश्व

पेट्रोल दरात पुन्हा वाढ , सामान्यांच्या खिशाला कात्री

पेट्रोलच्या किंमतीत (Petrol prices) साधारण 40 पैसे प्रती लीटर वाढ झाली आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचे भाव(Petrol prices) पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तर डिझेलचे भाव (Diesel prices) स्थिर आहेत. देशातील 4 मुख्य शहरामद्धे आज पेट्रोलच्या किंमतीत साधारण 40 पैसे प्रती लीटर वाढ झाली आहे. बुधवारी आणि गुरुवारी पेट्रोलची किंमत कोणत्याच शहरात वाढलेली नव्हती. परंतु गेल्या काही दिवसांत पेट्रोलदराने (Petrol prices) शंभरी गाठली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाच्या खिशाला कात्री बसली आहे. अशा परिस्थितीत पेट्रोलचे (Petrol) दर सतत वाढत असल्याचे दिसत आहे.

राजधानी दिल्लीतील पेट्रोल दराने देखील शंभरी गाठली आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमाती देखील वाढल्या आहेत. क्रूड ऑईल बेंचमार्क ब्रेंटचा भाव 0. 28 टक्क्यानी वाढला असून 75.82 डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहोचला आहे. तर wit क्रूड ऑईल याचा भाव 0.25 टक्क्यानी वाढला असून 75.15 डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहोचला आहे. गेल्या दोन महिन्यात पेट्रोलदरात सातत्याने वाढ झालेली आहे. तसेच दर वाढीत 33 वेळ वाढ झालेली आहे. तर डिझेलच्या दरात 32 वेळ वाढ झाली आहे.

विविध शरतील पेटोल-डिझेल भाव (प्रती लीटर)

नवी दिल्ली – पेट्रोल – 99.16 रुपये तर डिझेल – 89.18रुपये , मुंबई – पेट्रोल 105.24 रुपये ,तर डिझेल – 96.72 रुपये , कोलकाता – पेट्रोल – 99.04 रुपये, डिझेल – 92.03 रुपयेचेन्नई – पेट्रोल 100.13 रुपये , डिझेल 93.72 रुपये , नोएडा – पेट्रोल 96.42 रुपये, डिझेल 89.67 रुपये , बंगळुरु – पेट्रोल 103.5 रुपये, डिझेल 94.54 रुपये , हैदराबाद – पेट्रोल 113.05 रुपये, डिझेल 97.20 रुपये , पटना – पेट्रोल 101.21 रुपये, डिझेल 94.52 रुपये

दररोज 6 वाजता किंमतीत बदल होतो. नवीन दर सकाळी 6 वाजता लागू होतात. पेटोल डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. विदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडचे सर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेल भाव दररोज बदलत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hadfade Birch Fire Case: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT