Crude Oil Dainik Gomantak
अर्थविश्व

ओपेक देशांच्या या निर्णयामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मिळणार दिलासा

ओपेक देशांच्या या निर्णयामुळे जगात कच्च्या तेलाचा पुरवठा वाढेल आणि कच्च्या तेलाच्या किमती कमी होईल.

दैनिक गोमन्तक

तेल निर्यातदार देशांची संघटना (OPEC) आणि रशियासह सहयोगी देश जुलै आणि ऑगस्टमध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन दररोज 6,48,000 बॅरलपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती कमी होतील आणि अमेरिका, भारतासह अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होतील, असा विश्वास आहे. ओपेक देशांच्या या निर्णयामुळे इंधनाच्या वाढत्या किमती आणि त्याच्या प्रभावामुळे वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेला काहीसा दिलासा मिळणार आहे.(OPEC Decision on Crude Oil)

भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्वस्त कसे होऊ शकतात?

ओपेक देशांच्या या निर्णयामुळे जगात कच्च्या तेलाचा पुरवठा वाढेल आणि त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्याच्या रूपाने दिसून येईल. कच्चे तेल स्वस्त झाल्यास भारतासह अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर नक्कीच कमी होतील. भारताच्या क्रूड बास्केटच्या किमतीत घट झाल्यामुळे देशात इंधन स्वस्त होणार आहे.

जुलै-ऑगस्टपासून कच्च्या तेलाचे उत्पादन किती होईल

OPEC आणि सहयोगी देशांचा (OPEC Plus) निर्णय महामारीच्या काळात झालेली कपात वेगाने पुनर्संचयित करण्यासाठी उपयुक्त ठरेल. 2020 पासून हळूहळू उत्पादन कपात पुनर्स्थापित करण्यासाठी ओपेक समूह दरमहा 4,32,000 बॅरल प्रतिदिन उत्पादन करत होता. ते 6,48,000 बॅरल प्रतिदिन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वर्षाच्या सुरुवातीपासून अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमतीत 54 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, सुरुवातीला ओपेकचा प्रमुख देश सौदी अरेबियाने तेल पुरवठा वाढवण्याच्या पाश्चात्य देशांच्या विनंतीला विरोध केला. युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियावर घातलेल्या निर्बंधांमुळे कच्च्या तेलाचे उत्पादन घटले आहे. ही कमतरता पूर्ण करण्यासाठी ओपेक आणि सहयोगी देशांना पुरवठा वाढवण्यास सांगितले होते. इंधनाच्या चढ्या किमतींमुळे, महामारीतून सावरणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेत पुनरुज्जीवनाचा वेग मंदावेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT