Petrol Diesel Price hike today Dainik Gomantak
अर्थविश्व

डिझेल शंभरीपार तर पेट्रोलचेही दर वाढले, महागाईचा भडका

मुंबईत पहिल्यांदाच डिझेलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे.(Petrol Diesel Price )

दैनिक गोमन्तक

सरकारी तेल कंपन्यांनी (Oil Companies) आज सलग पाचव्या दिवशी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर वाढवले ​​आहेत.त्यामुळे आजही पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या (Diesel Price)किंमती वाढतानाच दिसत आहेत. आज डिझेलच्या (Diesel Price Today) किंमतीत 33 ते 37 पैशांनी वाढ झाली आहे तर पेट्रोलच्या किंमतीत 26 ते 30 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत पहिल्यांदाच डिझेलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे.त्याचबरोबर मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू -काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलच्या किंमती 100 रु. च्या पार झाल्या आहेत.आणि आज मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत(Petrol Diesel Price hike today)

दिल्लीत पेट्रोलची किंमत 103.84 रुपयांवर गेली आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमत 92.35 रुपये प्रति लीटर झाली आहे. तर मुंबईत सर्वात जास्त म्हणजेच पेट्रोलची किंमत 109.83 रुपये आणि डिझेलची किंमत 100.29 रुपये प्रति लीटर इतकी झाली आहे.कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 104.23 रुपये आहे. तर डिझेलची किंमत 95.58 रुपये लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 101.27 रुपये आणि डिझेल 96.93 रुपये लिटर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. त्याचाच परिणाम भारतीय बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर केवळ भारतातच नव्हे तर जागतिक बाजारात वाढत आहेत. अमेरिकेत पेट्रोल 7 वर्षातील सर्वात महाग आहे. वर्ष 2014 नंतर, अमेरिकेत एका गॅलन पेट्रोलची किंमत वाढून 5 डॉलरच्या जवळ गेली आहे.एका अहवालानुसार, सध्या कच्च्या तेलाच्या किमतींपासून दिलासा मिळण्याची आशा कुठलीच नाही.कारण, भारत आणि चीनसारख्या मोठ्या देशांकडून मागणी कायम आहे. त्याच वेळी, पुरवठा इतका वाढत नाही. ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन हळूहळू वाढवण्याबाबत बोलले आहे.

दरम्यान सततच्या होणाऱ्या या दरवाढीवर बोलताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आर्थिक धोरण आढाव्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले की पेट्रोल आणि डिझेलवरील कर व्यतिरिक्त इतर अनेक मुद्दे आहेत ज्यावर सरकारला निर्णय घ्यावा लागेल. तसेच ते म्हणाले की सरकार आणि रिझर्व्ह बँक या विषयांवर सतत बोलत असतात. आम्ही वेळोवेळी आमची चिंता सरकारपर्यंत पोहचवतो. ते म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलचा प्रश्न आहे, आम्ही या विषयावर चिंता व्यक्त केली आहे. आता यावर सरकारने निर्णय घ्यायचा आहे. मी यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: सैन्यात भरती होण्यासाठी धावायचा, आज बनला देशाचा हिरो! गुलवीर सिंहने रचला इतिहास; 10,000 मीटर शर्यतीत जिंकलं 'सिल्व्हर' पदक

Anjuna Drowning Incident: पाय घसरला अन् थेट उधाणलेल्या समुद्रात कोसळला! 26 वर्षीय मणिपूरच्या तरुणाचा मृत्यू;  हणजूण समुद्रकिनाऱ्यावरील धक्कादायक घटना

Sanjeel Kudchadkar Kidnapping Case: "चलत्या गाडीत गळा दाबून मारण्याचा प्रयत्न!" संजील कुडचडकरची धक्कादायक जबानी; पत्नी लुईझा अद्याप बेपत्ताच

Jantar Mantar Student Protest: आंदोलक दहशतवादी होते का? लोकसभेत प्रियांका गांधींचा रुद्रअवतार; विद्यार्थ्यांच्या दडपशाहीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल

Goa Drowning Incident: उधाणलेल्या लाटा अन् जीवरक्षकांचे शौर्य! सलग तीन दिवसांत 3 होड्या उलटल्या; कोलवा आणि बाणावलीत 28 मच्छीमारांची सुखरुप सुटका

SCROLL FOR NEXT