बुधवारी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किंमतीत वाढ जाहीर केली.  Dainik Gomantak
अर्थविश्व

पेट्रोल-डिझेलच्या किंमती 'वाढता वाढता वाढे'...

दैनिक गोमन्तक

पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किंमती (Prices) गगनाला भिडत असल्याने, महागाईमध्ये होणाऱ्या वाढीमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत विक्रमी वाढ होत आहे. देशातील तीन तेल विपणन कंपन्या एचपीसीएल (HPCL), बीपीसीएल (BPCL)आणि आयओसीनेही (IOC) बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ जाहीर केली. आता दिल्लीत (Delhi) एक लिटर पेट्रोलची किंमत 35 पैशांनी वाढून 106.19 रुपये प्रति लीटर झाली आहे. त्याचबरोबर डिझेलचे दर 35 पैशांनी वाढून 94.92 रुपये प्रति लीटर झाले आहेत. तर मुंबईत (Mumbai) एक लिटर पेट्रोलची किंमत 35 पैशांनी वाढून 112.11 रुपये प्रति लीटर झाली आहे. डिझेलची किंमत 37 पैशांनी वाढून 102.89 रुपये प्रति लीटर झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर तेव्हापासूनच लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

पेट्रोल आणि डिझेल का होत आहे महाग

कोरोनानंतर व्यावसायिक कार्यात झपाट्याने वाढ झाल्यामुळे जगात ऊर्जेची मागणी वाढली आहे. त्यामुळेच कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, चीनमध्ये तापमान झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळेच कच्च्या आणि नैसर्गिक वायूची मागणी वाढली आहे.

तज्ञांचे म्हणणे आहे की, मागणी आणि पुरवठा शिल्लक हे दर्शविते की बाजारात पुरवठ्याची समस्या आहे. 2022 च्या सुरुवातीला बाजारात याच्या किमतीत आणखीन वाढ होऊ शकते. मात्र, मार्चअखेर क्रूड कमी होऊ शकते.

व्यापारी आणि विश्लेषकांनी सांगितले की, उत्तर गोलार्धात हिवाळा जवळ येत आहे कारण तापमान कमी होते आणि हीटिंगची मागणी वाढत आहे. त्यामुळेच तेल, कोळसा आणि नैसर्गिक वायूचे दर उच्च राहण्याची शक्यता आहे.

ब्राझीलमध्ये, सरकारी तेल कंपनी पेट्रोब्रासने सोमवारी रात्री उशिरा सांगितले की, नोव्हेंबरमध्ये क्रूडला "असामान्य मागणी" मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ओल्ड गोवा येथे दुचाकीच्या अपघातात 17 वर्षीय तरुण ठार, डिचोलीत गॅरेजमधील दुचाकींना आग; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Mahalaya Pitru Paksha Shraddh 2024: श्राद्ध का करावे?

Ratnagiri Crime: स्वप्न, मृतदेह! खेड, रत्नागिरी प्रकरणात नवा ट्विस्ट; आर्याचा भोस्ते घाटात होता वावर

Goa Weather Update: गोव्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता, दोन दिवस 'यलो अलर्ट'

Goa Blitz Chess Tournament: ब्लिट्झ फिडे बुद्धिबळ स्पर्धेत नीतिश विजेता; अपराजित राहून सर्वाधिक साडेदहा गुणांची कमाई

SCROLL FOR NEXT