Money Dainik Gomantak
अर्थविश्व

Whatsapp Alert ! 25 लाखांची लॉटरी जिंकल्याचा मेसेज येत असल्यास...

देशाच्या विविध भागात बसलेले सायबर गुन्हेगार (Cyber ​​Criminals) वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत.

दैनिक गोमन्तक

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपला देश जसजसा प्रगती करत आहे, तस-तसे देशात टेक्नोलॉजीच्या मदतीने फसवणूक करण्याचे मार्गही बदलत आहेत. देशाच्या विविध भागात बसलेले सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. तथापि, फसवणूक करण्याच्या या सर्व पद्धतींमध्ये एक गोष्ट अगदी सामान्य आहे, आणि ती म्हणजे लोभ (Greed). (People Are Being Deceived By Sending A Message To Win A Lottery Of Rs 25 lakh On Whatsapp)

होय, आजच्या डिजिटल युगातील ठगही लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून लाखो कोटी रुपयांचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत आहेत. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) एक ऑडिओ मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये यामध्ये फसवणूक करणाऱ्याचा आवाज ऐकू येतो, ज्यामध्ये तो केबीसीच्या (KBC) माध्यमातून 25 लाख रुपयांची लॉटरी जिंकण्यासाठी लोकांना आमिष दाखवत आहे.

ऑडिओ संदेशात काय आहे

ऑडिओ मेसेजमध्ये ठग स्वत:ला KBC चा कस्टमर ऑफिसर असल्याचे सांगत आहे. ऑडिओ संदेशात तो आपले नाव राजीव शर्मा असून मुंबईत बोलत असल्याचे सांगत आहे. ज्या व्यक्तीपर्यंत हा मेसेज पोहोचत आहे, त्याच्या मोबाईलमध्ये तो ज्या नंबरवरुन व्हॉट्सअ‍ॅप चालवत आहे, त्या नंबरवर केबीसीकडून 25 लाखांची लॉटरी लागली आहे.

दरम्यान, आपल्या कंपनीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत 5 हजार लोकांचे मोबाईल (Mobile) क्रमांक सामील करण्यात आल्याचे या व्यक्तीने संदेशात म्हटले आहे. त्याच्या कंपनीने 5 हजार लोकांपैकी फक्त त्याच व्यक्तीची 25 लाख रुपयांच्या बक्षीसासाठी निवड केली आहे. इथे विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या लोकांना हे मेसेज फॉरवर्ड केले जात आहेत, त्यांना 25 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, हे प्रत्येकाला समजत आहे.

ठग whatsapp वर कॉल करण्यास सांगतोय

ऑडिओ संदेशात 25 लाख रुपयांची रक्कम कशी मिळवायची याचा फॉर्म्युला देखील सांगण्यात आला आहे. प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये व्यवस्थापकाचा फोन नंबर सेव्ह करावा लागेल. आणि नंतर त्याला व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कॉल करावा लागेल. बक्षीस मिळवण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप कॉल करावा लागेल, साधा कॉल केल्यास मॅनेजरशी संपर्क साधता येणार नाही, असं ठग सांगत आहे. त्यामुळे तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल करावा लागेल. व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल केल्यानंतर मॅनेजर तुम्हाला लॉटरीशी संबंधित उर्वरित माहिती देईल.

शिवाय, तुम्हालाही एखाद्या अनोळखी नंबरवरुन असा ऑडिओ मेसेज आला असेल, तर सर्वप्रथम तो नंबर ब्लॉक करा. याशिवाय तुम्ही पोलिसांत तक्रारही करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT