Money Dainik Gomantak
अर्थविश्व

Pension Scheme: पेन्शनधारकांची चांदी! सरकारने घेतला मोठा निर्णय, 'या' तारखेला मिळणार पैसे

Pension News Update: पेन्शनधारकांना दिलासा देणारी बातमी आहे. पेन्शनधारकांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी वेळोवेळी अनेक नवीन योजना राबवल्या आहेत.

Manish Jadhav

Pension News Update: पेन्शनधारकांना दिलासा देणारी बातमी आहे. पेन्शनधारकांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी वेळोवेळी अनेक नवीन योजना राबवल्या आहेत.

आता राज्य सरकारने पेन्शनधारकांसाठी नवी घोषणा केली असून, त्यानंतर महिन्याच्या पहिल्या तारखेलाच त्यांना पैसे मिळतील.

याबाबतची माहिती उत्तराखंड सरकारने दिली आहे. आता राज्यातील जनतेला पेन्शनसाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही.

7.62 लाख लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे

आता तुम्हाला पेन्शनसाठी (Pension) लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही, असे राज्य सरकारने म्हटले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी राज्य सरकारने विशेष योजना सुरु केली आहे. सरकारने या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. याचा थेट लाभ 7.62 लाख लाभार्थ्यांना होणार आहे.

पैसे थेट खात्यात येतील

समाजकल्याण विभागाच्या विविध पेन्शन योजनांच्या लाभार्थ्यांना दर महिन्याच्या पहिल्या तारखेला निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या अशा पेन्शनधारकांची संख्या 7.62 लाख आहे, ज्यांच्या बँक खात्यांमध्ये पेन्शनची रक्कम दर महिन्याच्या एका तारखेला डीबीटीद्वारे पाठवली जाईल.

अतिरिक्त मुख्य सचिव आनंद बर्धन म्हणाले की, एप्रिल महिन्याची पेन्शन भरण्यासाठी 15 मे पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

6-6 महिन्यांपासून पेन्शन मिळत नाही

लाभार्थ्यांना पेन्शन देण्यास मोठा विलंब होतो. कधीकधी त्यांना सहा महिने पेन्शन मिळत नाही. अशा परिस्थितीत त्यांना विभागाच्या कार्यालयात चकरा माराव्या लागतात. नुकताच हा विषय मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासमोर आला.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली

या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव आनंद बर्धन, माहिती महासंचालक बंशीधर तिवारी आणि समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

समाजकल्याण निवृत्ती वेतन योजनांमध्ये पैसे भरण्यासाठी दर महिन्याला एक तारीख निश्चित करण्याचे निर्देश दिले. तात्काळ कारवाई करत सरकारने (Government) तारीखही निश्चित केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT