Income Tax Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax: क्रेडिट कार्डने इन्कम टॅक्स भरणाऱ्यांनो सावधान! एका चुकीमुळे होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान; आधी 'हा' नियम वाचाच

Income Tax Return Filing Online: इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख जसजशी जवळ येते, तसतसे अनेक करदाते टॅक्स पेमेंटच्या विविध पर्यायांचा विचार करु लागतात.

Manish Jadhav

Income Tax Return Filing Online: इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख जसजशी जवळ येते, तसतसे अनेक करदाते टॅक्स पेमेंटच्या विविध पर्यायांचा विचार करु लागतात. सध्या नेट बँकिंग आणि युपीआय व्यतिरिक्त क्रेडिट कार्डद्वारेही इन्कम टॅक्स भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण, क्रेडिट कार्डचा वापर करुन टॅक्स भरणे खरोखरच शहाणपणाचे आहे का, याबाबतचे नियम, फायदे आणि तोटे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

बँकबाजार डॉट कॉमचे सीईओ आदिल शेट्टी यांच्या मते, आयकर विभागाला क्रेडिट कार्डद्वारे टॅक्स भरण्यास कोणतीही हरकत नाही. टॅक्स डिपार्टमेंटचे पेमेंट गेटवे युपीआय आणि नेट बँकिंगसोबतच डेबिट आणि क्रेडिट कार्डने पेमेंट करण्याचा पर्यायही करदात्यांना देते.

क्रेडिट कार्डद्वारे (Credit Card) टॅक्स भरण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पैशांची लवचिकता (Flexibility). जर शेवटच्या क्षणी तुमच्याकडे रोख रकमेची कमतरता असेल, तर क्रेडिट कार्डचा वापर करुन तुम्ही लेट फी किंवा दंडापासून वाचू शकता. यामुळे तुमच्या बिलिंग सायकलीनुसार तुम्हाला तब्बल 45 दिवसांपर्यंतचा व्याजमुक्त कालावधी मिळतो. अनेक जण रिवॉर्ड पॉइंट्स मिळवण्याच्या आशेने क्रेडिट कार्डने मोठी रक्कम टॅक्स म्हणून भरतात. परंतु, तज्ज्ञांच्या मते, सर्वच बँका टॅक्स पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट्स देत नाहीत.

उलट, क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला अतिरिक्त व्यवहार शुल्क द्यावे लागू शकते. म्हणूनच, 'कार्डइनसाइडर डॉट कॉम'चे सह-संस्थापक अंकुर मित्तल यांच्या सल्ल्यानुसार, क्रेडिट कार्डने इनकम टॅक्स तेव्हाच भरावा, जेव्हा मिळणारे रिवॉर्ड्स किंवा फायदे हे लागणाऱ्या अतिरिक्त शुल्कापेक्षा जास्त असतील.

या सुविधेचे काही मोठे तोटेही आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. क्रेडिट कार्डद्वारे मोठी टॅक्सची रक्कम भरल्यास तुमच्या कार्डच्या क्रेडिट लिमिटचा मोठा हिस्सा ब्लॉक होतो. यामुळे तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो (CUR) अचानक वाढतो, ज्याचा थेट नकारात्मक परिणाम तुमच्या सिबिल (Cibil) स्कोरवर होऊ शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्ही पुढील महिन्यात क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर पूर्ण भरु शकला नाहीत आणि ते पुढील महिन्यांसाठी पुढे ढकलले, तर तुम्हाला त्यावर प्रचंड व्याज द्यावे लागेल.

अशा परिस्थितीत मिळणारे सर्व फायदे संपून तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता. त्यामुळे कार्ड स्वाइप करण्यापूर्वी, पुढील महिन्यात पूर्ण बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे आहेत का, याची खात्री करणे अत्यंत गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT