OnePlus 13 
अर्थविश्व

OnePlus 13 launching: वन प्लस 12 पेक्षा 13 मध्ये काय खास, भारतात कधी होणार लॉन्च? पाच महत्वाचे मुद्दे

OnePlus 13 India launching Date: बहुप्रतीक्षित वन प्लस १३ चीनमध्ये लॉन्च झाला असून, लवकरच तो भारतात देखील लॉन्च होणार आहे.

Pramod Yadav

OnePlus 13 India launching Date, Camera, Features, Specification

बहुप्रतीक्षित वन प्लस १३ लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. मोबाईल चीनमध्ये लॉन्च झाला असून, आता तो भारतीय मार्केटमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. वन प्लस १३ मॉडेलमध्ये काही महत्वाचे बदल आणि Advance Features देण्यात आले आहेत. नव्या स्मार्टफोनला जागतिक स्तरावरील महत्वाचे सर्व प्रमाणपत्र मिळाले आहेत.

कंपनीने नव्याने येणाऱ्या वन प्लस १३ मध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत. फोनचे डिझाईन, क्षमता, बॅटरी लाईफ अपग्रेड करण्यात आली आहे. फोनबाबत महत्वाचे पाच अपडेट जाणून घेऊयात.

डिझाईन (OnePlus 13 Design)

वन प्लस १२ पेक्षा १३ च्या डिझाईनमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. वनप्लसचे डिझाईन अधिक मजबूत आणि वॉटर व डस्ट प्रूफ करण्यात आला आहे.

डिस्प्ले (Display)

समोर आलेल्या माहितीनुसार वन प्लस १२ आणि १३ चा डिस्प्ले जवळपास एकसारखाच आहे. दरम्यान, १३ मध्ये ग्राहकांना अधिक चांगला अनुभव मिळणार असून, डिस्प्लेला मायक्रो कर्व्ह देण्यात आलेत. तसेच, यात अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर आणि अॅक्वा टर फिचर्स देण्यात आलेत.

परफॉर्मन्स (Performance/ Processor)

वन प्लस १३ फोनमध्ये १६ जीबी रॅमसह ८ एलिट चीपसेट स्नॅपड्रगन प्रोसेसर देण्यात आला आहे. नव्या चीपसेटमुळे मोबाईलचा परफॉर्मन्स ४५ टक्के वाढणार असून, पॉवर देखील ३० टक्क्यांनी वाढणार आहे. तसेच, या फोनला Android 14 Oxygen OS 15 देण्यात आली आहे.

कॅमेरा (Camera)

वन प्लस १२ आणि १३ चा कॅमेरा जवळपास एकसारखा आहे. दोन्ही फोनला ५० मेगापिक्सल कॅमेरा असून, ३एक्स ऑपटीकल झूम देण्यात आले आहे. दरम्यान, १३ मध्ये आणखी काही नवे फिचर्स वाढण्याची शक्यता आहे. पण, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

बॅटरी (Battery Life)

वन प्लस १३ ला ६००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. १२ च्या तुलनेत (५,४०० mAh) ही क्षमता अधिक आहे. त्यामुळे सहाजिकच मोबाईलची बॅटरी लाईफ वाढणार आहे. तसेच, या फोनला १०० W फास्ट चार्चिंगचा पर्याय देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT