PM Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Old Pension Scheme बाबत संसदेत मोठा खुलासा, PM मोदींनी केली 'ही' घोषणा!

Old Pension News: देशभरातून जुन्या पेन्शनबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यात आली आहे.

Manish Jadhav

Old Pension News: देशभरातून जुन्या पेन्शनबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यात आली आहे. त्याचवेळी, त्याची पुन्हा अंमलबजावणी करण्याची मागणी अनेक राज्यांमध्ये जोरात सुरु आहे.

जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शन प्रणालीबाबत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अर्थ राज्यमंत्र्यांनी मोठा खुलासा केला आहे. मोदी सरकारने (Modi Govt) जुन्या पेन्शन योजनेबाबत (OPS) मोठी अपडेट सभागृहात दिली आहे.

भागवत कराड यांनी माहिती दिली

लोकसभेत माहिती देताना अर्थ राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले की, सध्या देशातील सुमारे 5 राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यात आली आहे.

यामध्ये राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब (Punjab) आणि हिमाचल प्रदेशचा समावेश आहे. या राज्य सरकारांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत केंद्राला कळवले आहे.

अहवालात काय म्हटले आहे माहित आहे?

भागवत कराड पुढे म्हणाले की, 'राज्य वित्त: 2022-23 च्या अर्थसंकल्पाचा अभ्यास' या आरबीआयच्या अहवालानुसार, आर्थिक संसाधनांमधील वार्षिक बचत ही अल्पकालीन आहे. या राज्यांना पुढील वर्षांमध्ये निवृत्त पेन्शन दायित्वांचा धोका आहे.

पीएफआरडीएलाही माहिती दिली

संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री म्हणाले की, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) या राज्य सरकारांनीही पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ला जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कळवले आहे.

ही राज्यांसाठी चिंतेची बाब आहे

जुन्या पेन्शन योजनेबाबत देशात अनेक प्रकारचे अहवाल समोर येत आहेत. नुकतेच आरबीआयने सांगितले होते की, जुनी पेन्शन योजना लागू करणाऱ्या सर्व राज्यांना आगामी काळात आर्थिक व्यवस्थापनाचा धोका निर्माण होऊ शकतो.

ते पुढे म्हणाले की, महामारीपासून राज्यांच्या स्थितीत बरेच बदल झाले आहेत, त्यामुळे येणारा काळ खूप चिंताजनक असू शकतो. या कारणास्तव RBI ने OPS लागू करणाऱ्या राज्यांसाठी ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

Pandharpur Wari: वारकऱ्यांना सरकारकडून 5 लाखांपर्यंत आर्थिक मदत; प्लास्टिकमुक्त वारीला द्या प्राधान्य- मुख्यमंत्री डॉ. सावंत

PF Withdrawal New Rule: नोकरदारांनो लक्ष द्या! पीएफ खात्यातून ॲडव्हान्स काढण्याचे बदलले नियम; आता किती वेळा काढता येणार पैसे?

SCROLL FOR NEXT