No changes in Petrol Diesel Price in today  Dainik Gomantak
अर्थविश्व

पेट्रोल डिझेलचे भाव आजही स्थिरच, सर्वसामान्यांना काहीसा दिलासा

सरकारी मालकीच्या तेल कंपन्या IOC, HPCL आणि BPCL यांनी आजच्या तेलाच्या किमती जाहीर केल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

सरकारी मालकीच्या तेल कंपन्या IOC, HPCL आणि BPCL यांनी आजच्या तेलाच्या (Oil Price) किमती जाहीर केल्या आहेत. तेल कंपन्यांनी (Oil Companies) मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात कोणताही बदल केलेला नाही. सलग दुसऱ्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 107.59 रुपये आहे. तर एक लिटर डिझेलचा दर 96.32 रुपयांवरच स्थिर आहे (Petrol Diesel Price).(No changes in Petrol Diesel Price in today)

जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर

आज दिल्लीत पेट्रोलचा दर 107.59 रुपये तर डिझेलचा दर 96.32 रुपये प्रति लिटर आहे,तर देशाचं आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर 113.46 रुपये आणि डिझेलचा दर 104.38 रुपये प्रतिलिटर आहे.कोलकात्यात पेट्रोलचा दर 108.11 रुपये तर डिझेलचा दर 99.43 रुपये प्रति लिटर आहे.त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोल 104.52 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 100.59 रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल आणि डिझेलची किंमत नेमकी कशी ठरवली जाते?

  • भारतात पेट्रोल आणि डिझेलची किंमत चार टप्प्यात ठरवली जाते.

  • रिफायनरी, येथे पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादने कच्च्या तेलापासून काढली जातात.

  • तेल कंपन्या त्यांचा नफा कमावतात आणि पेट्रोल पंपावर तेल पोहोचवतात.

  • इथे पेट्रोल पंप मालक त्याचे निश्चित कमिशन घेतो.

  • सामान्य जनता - केंद्र आणि राज्य सरकारला उत्पादन शुल्क आणि व्हॅट भरून ते तेल घेते.

असे जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोलचे भाव

पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत दररोज सुधारणा केली जाते आणि त्यानंतर सकाळी 6 वाजता या नवीन किमती जाहीर केल्या जातात . तुमच्या जवळच्या पेट्रोल पंपावर तुम्ही तुमच्या घरी बसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता. इंडियनऑईलचे ग्राहक त्यांच्या मोबाईलवरून RSP सोबत सिटी कोड टाकून 9224992249 वर संदेश पाठवतील. तुम्हाला इंडियन ऑइल (IOCL) च्या अधिकृत वेबसाइटवर शहर कोड सापडेल.

मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलची नवीनतम किंमत पाठवली जाईल. त्याचप्रमाणे, BPCL ग्राहक त्यांच्या मोबाईलवरून RSP टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवू शकतात. HPCL ग्राहक 9222201122 वर HPPprice टाइप करून SMS पाठवू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT