India Toll Dainik Goamtank
अर्थविश्व

Toll Pass: एकदाच पैसे भरा अन् 15 वर्षांसाठी टोलमधून मिळवा सूट! जाणून घ्या सरकारचा प्लॅन

Toll Plaza on Highway: जर सर्व काही व्यवस्थित झाले, तर येणाऱ्या काळात देशातील महामार्गांवरुन प्रवास करणे खूप सोपे आणि सोयीस्कर होईल.

Manish Jadhav

Toll Plaza on Highway: जर सर्व काही व्यवस्थित झाले, तर येणाऱ्या काळात देशातील महामार्गांवरुन प्रवास करणे खूप सोपे आणि सोयीस्कर होईल. अनेक माध्यमांमध्ये असा दावा केला जात आहे की, भारत सरकार वार्षिक आणि आजीवन टोल पास सुरु करण्याची योजना आखत आहे. याद्वारे, महामार्गांवरुन प्रवास करणाऱ्या लोकांना कोणत्याही त्रासाशिवाय आणि कमी खर्चात प्रवास करण्याचा अनुभव देण्याची योजना आहे. या योजनेचा उद्देश टोल प्लाझावरील गर्दी कमी करणे आणि विद्यमान टोल पेमेंट सिस्टमला स्वस्त पर्याय उपलब्ध करुन देणे आहे.

हा टोल पास कसा चालेल?

टाईम्स ऑफ इंडिया (टीओआय) च्या वृत्तानुसार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय प्रस्तावाचा आढावा घेण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. नवीन प्रणालीनुसार, टोलमधून जाणाऱ्या लोकांसमोर दोन पर्याय असतील. पहिला त्यांना वार्षिक टोल पास मिळू शकेल, जो 3,000 रुपये भरल्यानंतर उपलब्ध होईल. या पासमुळे तुम्ही एका वर्षासाठी राष्ट्रीय महामार्ग (National Highway) आणि द्रुतगती महामार्गांवर प्रवास करु शकाल. त्याचप्रमाणे, आजीवन टोल पास 15 वर्षांसाठी वैध असेल. 30,000 रुपये भरल्यानंतर हा पास उपलब्ध होईल, त्यामुळे वारंवार टोल भरण्याची गरज भासणार नाही. हे पास सध्याच्या FASTag प्रणालीमध्ये समाविष्ट केले जातील, असेही सांगितले जात आहे.

ही प्रणाली फक्त फास्टॅगमध्येच लागू केली जाईल

जर महामार्गांवर पास सिस्टम लागू केली तर फास्टॅग कोणत्याही एक्‍सट्रा इक्‍युपमेंटशिवाय किंवा खर्चाशिवाय सहजपणे बदलता येईल. सध्या, महामार्गावरुन सातत्याने प्रवास करणाऱ्यांना फक्त मासिक टोल पास मिळू शकतो. मासिक टोल पासची किंमत दरमहा 340 रुपये किंवा वर्षाला 4,080 रुपये आहे. तथापि, हे पास अशा लोकांसाठी कमी सोयीस्कर आहेत कारण ते फक्त एकाच टोल प्लाझावर वैध आहेत. ही मर्यादा काढून टाकल्याने प्रस्तावित वार्षिक आणि आजीवन टोल पास आणखी चांगले होतील. यामुळे वापरकर्त्यांना देशभरातील सर्व टोल रस्त्यांवर कोणत्याही व्यत्ययाशिवाय आणि सहजतेने प्रवास करता येईल.

खाजगी वाहनांना 26 टक्के टोल बूथ मिळतात

राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या लोकांना या नवीन प्रणालीचा मोठा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. खाजगी वाहनांचा सध्या एकूण टोल महसुलात 26 टक्के वाटा असून टोल बूथवर, विशेषतः गर्दीच्या वेळी, वाहतूक कोंडीचे एक प्रमुख कारण ते आहेत. सरकारला आशा आहे की, टोल वसूल करण्याची प्रक्रिया सोपी करुन, टोलवर जात असलेला वेळ कमी करता येईल. तसेच, महामार्गावरुन नियमित प्रवास करणाऱ्यांना अमर्यादित प्रवासाचा पर्याय उपलब्ध करुन देता येईल. यामुळे लोकांना आवश्यक आर्थिक दिलासा देखील मिळेल.

वापरकर्त्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय वार्षिक आणि आजीवन पास सुरु करण्यासोबतच प्रति किमी टोल शुल्क कमी करण्याचे मार्ग शोधत आहे. अलिकडच्याच एका मुलाखतीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले होते की, टोल कराच्या समस्यांबाबत सरकारने पडताळणी केली असून तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक योजना राबवण्याची तयारी करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"म्हादई गोंयची माय,15 कोटी खर्च, तरीही तारीख पे तारीख का?" आमदार बोरकरांचा विधानसभेत थेट सवाल

Video: व्हायरल होण्याच्या नादात तरुणाई बेभान! देशातील सर्वात लांब पुलावर लटकून पठ्ठ्याचा धोकादायक स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धूमाकूळ

Sudan Army Airstrike: सुदानी लष्कराची मोठी कारवाई! दारफुर प्रांतातील विमानतळावर मोठा हवाई हल्ला; 40 कोलंबियन सैनिक ठार

माटोळी विक्रेत्यांना 'सोपो' माफ, परप्रांतीय होलसेल विक्रेत्यांवर कठोर कारवाई; मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन

Rohit-Virat Comeback: चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी पुन्हा मैदानात उतरणार रोहित-विराट; ऑस्ट्रेलियात रंगणार रणसंग्राम

SCROLL FOR NEXT