Marriage  Dainik Gomantak
अर्थविश्व

Newly Married Couples: विवाहित जोडप्यांसाठी खास योजना, वर्षाभरासाठी मिळणार 51 हजार रुपये !

Pension Scheme: आजच्या काळात, बहुतेक लोक सरकारी नोकऱ्यांना प्राधान्य देतात कारण चांगली पेन्शन मिळण्याची शक्यता असते.

दैनिक गोमन्तक

Pension Scheme: आजच्या काळात, बहुतेक लोक सरकारी नोकऱ्यांना प्राधान्य देतात कारण चांगली पेन्शन मिळण्याची शक्यता असते. दुसरीकडे, खाजगी नोकरी करणाऱ्यांनाही पेन्शनचा पर्याय आहे, पण घर चालवण्यासाठी ही रक्कम खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही मोदी सरकारच्या या योजनेत अर्ज करा, जेणेकरुन तुम्हाला वार्षिक निश्चित पेन्शनचा लाभ घेता येईल. तुम्ही या योजनेत फक्त 31 मार्च 2023 पर्यंत अर्ज करु शकता. तुम्ही योग्यवेळी गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक 51 हजार रुपये पेन्शन मिळू शकते.

वार्षिक 51 हजार रुपये मिळतील

जर पती-पत्नी दोघांनी या योजनेत अर्ज केला तर त्यांना प्रधानमंत्री वय वंदना योजनेत सुमारे 3 लाख 7 हजार रुपये जमा करावे लागतील. अशा प्रकारे तुमची एकूण गुंतवणूक 6 लाख 15 हजार रुपये होईल. या योजनेवर सरकार (Government) 7.40% वार्षिक व्याज देते. अशा प्रकारे गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक 51 हजार पेन्शन मिळेल. जर तुम्हाला ही पेन्शन मासिक घ्यायची असेल तर तुम्हाला दरमहा 4100 रुपये पेन्शन म्हणून मिळेल.

10 वर्षांनी पूर्ण पैसे मिळतील

तुम्ही या योजनेत जितकीही गुंतवणूक कराल, सरकार तुम्हाला ती रक्कम 10 वर्षांनंतर परत करेल, म्हणजेच तुम्हाला या योजनेत फक्त 10 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार दर महिन्याला किंवा दरवर्षी पेन्शन देणे सुरु होईल. या दरम्यान तुम्ही ही पॉलिसी सरेंडर केल्यास, तुम्ही या योजनेत जितकी गुंतवणूक (Investment) केली तितकी रक्कम परत केली जाईल.

योजनेबद्दल जाणून घ्या

या योजनेचे नाव प्रधानमंत्री वय वंदना योजना आहे, जी एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेत पेन्शनधारकाला मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक आधारावर पेन्शन दिली जाते. केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) दोन्ही मिळून ही योजना चालवतात. 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक या योजनेतर्गंत अर्ज करु शकतात. या योजनेत गुंतवणूकदार 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT