Vande Bharat Train Dainik Gomantak
अर्थविश्व

Vande Bharat Express: ईशान्य भारतात लवकरच धावणार पहिली वंदे भारत, PM मोदी दाखवणार हिरवा झेंडा

Vande Bharat Train: ही ट्रेन न्यू जलपाईगुडी ते गुवाहाटी दरम्यान आठवड्यातून सहा दिवस धावेल. ती सुमारे 410 किमीचे अंतर 6 तासात पार करेल.

Manish Jadhav

New Vande Bharat Express Train: ईशान्य भारतात लवकरच पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. ही ट्रेन न्यू जलपाईगुडी ते गुवाहाटी दरम्यान आठवड्यातून सहा दिवस धावेल. ती सुमारे 410 किमीचे अंतर 6 तासात पार करेल.

ही ट्रेन सिलीगुडीतील न्यू जलपाईगुडी येथून सुटेल आणि आसाममधील (Assam) गुवाहाटी येथे पोहोचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) लवकरच या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवू शकतात. त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

आत्तापर्यंत, देशाला सेमी हाय स्पीड असलेल्या 17 वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत. नुकतेच हावडा-पुरी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

मार्ग आणि वेळ

जलपाईगुडी ते गुवाहाटी अशी धावणारी नवी वंदे भारत एक्सप्रेस पाच स्थानकांवर थांबेल. ही गाडी न्यू अलिरुद्वार, न्यू बोंगाईगाव आणि कामाख्या येथे थांबेल.

ट्रेन क्रमांक 22227 न्यू जलपाईगुडी - गुवाहाटी वंदे भारत एक्सप्रेस सकाळी 06:10 वाजता सुटेल आणि दुपारी 12:00 वाजता गुवाहाटीला पोहोचेल.

तर, गुवाहाटीहून ही ट्रेन 22228 म्हणून दुपारी 4:30 वाजता सुटेल आणि रात्री 10:20 वाजता न्यू जलपाईगुडीला पोहोचेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT