Narendra Singh Tomar Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांचे बल्ले-बल्ले, पीएम किसानच्या 14 व्या हप्त्यापूर्वी कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Narendra Singh Tomar: सरकारने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पीएम किसानचा शेवटचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणे अपेक्षित आहे.

Manish Jadhav

PM Kisan Samman Nidhi: देशभरातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सरकारने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पीएम किसानचा शेवटचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणे अपेक्षित आहे.

मात्र या हप्त्याचे पैसे येण्यापूर्वीच केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, केंद्र आणि विविध राज्य सरकारे छोट्या शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान नेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या बळकट होण्यास मदत होईल.

मोठ्या शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान...

हैदराबाद (Hyderabad) येथे आयोजित एका कार्यक्रमात कृषिमंत्र्यांनी यावर भर दिला की, 'आज गरज आहे की आपण कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान कसे जोडता येईल.'

देशातील मोठ्या शेतकऱ्यांकडे तंत्रज्ञान आणि कृषी विज्ञान केंद्रांसह सर्व संसाधने उपलब्ध आहेत. ज्यांना तंत्रज्ञान उपलब्ध नाही, अशा छोट्या शेतकऱ्यांपर्यंत आणि इतरांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे.

ते पुढे म्हणाले की, 'म्हणूनच शेतीचे डिजिटायझेशन कसे वाढवता येईल आणि डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचता येईल, या दिशेने केंद्र आणि राज्य सरकारे काम करत आहेत.'

11.50 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये पोहोचले

पीएम किसान योजना आणि सरकारी खरेदीचे उदाहरण देत तोमर म्हणाले की, या दोन योजनांवर यापूर्वी सर्व प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात होते.

PM-किसान योजनेचे 2.40 लाख कोटी रुपये 11.50 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत. आता देशात कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही.

तसेच, शेतकऱ्यांचा शेतमाल कोणतीही तक्रार न करता खरेदी केल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे पोहोचतात. ते पुढे म्हणाले की, 'शेतकऱ्यांना (Farmer) त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी, त्यांची पिके वाचवण्यासाठी आणि त्यांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकार या दिशेने पूर्ण गांभीर्याने काम करत आहेत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT