Narendra Singh Tomar Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: पीएम किसान संदर्भात कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा, 14 व्या हप्त्यापूर्वी आले 'हे' अपडेट!

PM Kisan Samman Nidhi Scheme: या योजनेंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे.

Manish Jadhav

PM Kisan Samman Nidhi Scheme: केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. या योजनेंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे.

सध्या पीएम किसानबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शुक्रवारी केंद्रशासित प्रदेशांना (UTs) पीएम-किसानसह सर्व केंद्रीय कार्यक्रम पूर्णपणे लागू करण्यास सांगितले, जेणेकरुन शेतकऱ्यांना सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू शकले.

अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले

एका सरकारी निवेदनात म्हटले आहे की, तोमर यांच्या अध्यक्षतेखाली कृषी क्षेत्राचा सर्वसमावेशक विकास करण्याच्या उद्देशाने केंद्रशासित प्रदेशांसोबत राष्ट्रीय राजधानीत बैठक झाली. यावेळी तोमर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) देशाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून पूर्ण बांधिलकीने काम करत आहेत.

प्रत्येकाला KCC आणि PM किसानचा लाभ मिळाला पाहिजे

केंद्रशासित प्रदेशांमध्येही या योजनांची 100% अंमलबजावणी सुनिश्चित केली जावी, जेणेकरुन तेथील सर्व शेतकऱ्यांना (Farmers) कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा. (किसान क्रेडिट कार्ड) त्याचबरोबर, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसह इतर योजनांचाही लाभ मिळाला पाहिजे.

केंद्र सरकारकडे निधीची कमतरता नाही

ते पुढे म्हणाले की, ''इतर राज्यांसोबत ही क्षेत्रेही विकासाच्या शर्यतीत आघाडीवर असली पाहिजेत. केंद्रशासित प्रदेशातील लहान शेतकऱ्यांच्या राहणीमानातही बदल व्हायला हवा. केंद्र सरकारकडे योजना आणि निधीची कमतरता नाही, योजनांची पूर्ण अंमलबजावणी करण्याची गरज आहे."

केंद्रीय कृषी सचिवांनी ही माहिती दिली

बैठकीत केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांनीही आपले विचार मांडले. या बैठकीत कृषी आणि इतर केंद्रीय मंत्रालये आणि संबंधित केंद्र/राज्य संस्थांचे अधिकारीही उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

Asia Cup 2025: टी-20 आशिया कपमध्ये भारताच्या नावावर 'महा कीर्तिमान'! 'या' संघाविरुद्ध उभारला धावांचा डोंगर; यंदा कोण मोडणार टीम इंडियाचा रेकॉर्ड?

Goa Waterfall Ban: पावसाळ्यातील अपघातांवर अंकुश! उत्तर गोव्यातील धबधबे अन् नद्यांमध्ये प्रवेशास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

Viral Video: बघता-बघता फिटनेस सेंटर बनले 'आखाडा'; जिममध्ये तरुणांची तुंबळ हाणामारी, रॉडने हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल

Hartalika Tritiya 2025: अखंड सौभाग्य आणि सुयोग्य वरासाठी 'हरितालिका व्रत'; वेळ आणि पूजेची पद्धत काय? सविस्तर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT