Vande Bharat Dainik Gomantak
अर्थविश्व

Vande Bharat Express: मोदी सरकारने दिली आनंदाची बातमी! वंदे भारत ट्रेन आता आणखी होणार खास, 30 मे पासून...

Vande Bharat Train: मोदी सरकारकडून रेल्वे प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरवल्या जात आहेत.

Manish Jadhav

Vande Bharat Train: मोदी सरकारकडून रेल्वे प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरवल्या जात आहेत. दरम्यान, रेल्वेचे जाळे सुधारण्यासाठी सरकार अनेक मोठी पाऊले उचलत आहे. यातच आता, मोदी सरकारने वंदे भारत बाबत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. त्यामुळे लोकांना अधिक सुविधा मिळणार आहेत.

वंदे भारत ट्रेन

वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून देशातील लोकांना हायस्पीड ट्रेन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. वंदे भारत ट्रेनमधून प्रवास (Travel) करणाऱ्या लोकांना एक नवीन अनुभव मिळत आहे.

तसेच, 30 मे पासून या ट्रेनद्वारे लोकांना आणखी चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. याची घोषणाही मोदी सरकारने केली आहे.

नवीन थांबा

आता वंदे भारत ट्रेनच्या मार्गात नवीन स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी ट्विट करत म्हटले की, 'लोकांना चांगल्या कनेक्टिव्हिटीसह सेवा देण्यासाठी, ट्रेन क्रमांक 20901/20902 मुंबई सेंट्रल-गांधीनगर राजधानी वंदे भारत एक्स्प्रेसचा 30 मे 2023 पासून बोरिवली स्टेशनवर थांबा असेल. याशिवाय ही ट्रेन बुधवारी नाही तर रविवारी धावणार आहे.'

सेमी-हाय स्पीड ट्रेन

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली भारतातील पहिली सेमी-हाय स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. ती प्रवाशांना (Passengers) अधिक चांगला अनुभव देत आहे. शताब्दी, राजधानी आणि लोकल गाड्या वंदे भारत ट्रेनमध्ये बदलण्याची तयारी सुरु आहे. त्याचवेळी, वंदे भारत ट्रेन ताशी 160 किमी वेगाने धावते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT