अर्थविश्व

Multibagger Stocks : तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत का? 20 वर्षांत दिला आहे 500 पट परतावा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन संयम राखणाऱ्या गुंतवणूकदारांची आज चांदी होत आहे.

Ashutosh Masgaunde

आज शेअर बाजाराबाबत अनेकांना आकर्षण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये शेअर बाजारातील विविध गोष्टींबाबत जागरुकता निर्माण होत आहे. तसेच अनेकजण शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात करत आहेत.

आज आम्ही अशाच काही मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरली आहे. ज्योती रेजिन्स अँड अ‍ॅडेसिव्ह लि., सिम्फनीसह असे अनेक स्टॉक यामध्ये समाविष्ट आहेत.

परतावा देण्याच्या बाबतीत हा स्टॉक अव्वल

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन संयम राखणाऱ्या गुंतवणूकदारांची आज चांदी होत आहे. गेल्या दोन दशकांत ज्या स्टॉक्सनी मल्टी बॅगर रिटर्न दिले आहेत त्यांची यादी पाहिली तर ज्योती रेझिन यांचे नाव अग्रस्थानी येते. दोन दशकात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 5,281 पट वाढली आहे. कंपनीचे शेअर्स 13 जून रोजी 1,408.30 रुपयांवर पोहोचले, 2003 मध्ये त्याच दिवशी ते 0.27 रुपये होते.

या स्टॉक्सने 20 वर्षांत श्रीमंत केले

ज्योती रेझिन सारखे सुमारे 33 स्टॉक आहेत, ज्यांनी या कालावधीत दलाल स्ट्रीटवर त्यांच्या गुंतवणूकदारांना 500 पट परतावा दिला आहे. यामध्ये सिम्फनीच्या शेअरची किंमत 3,064 पट, केईआय इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 2,313 पट, बोरोसिल रिन्यूएबल्सच्या शेअरची किंमत 2,234 पट, विनती ऑरगॅनिक्सच्या शेअरची किंमत 1,572 पट आणि रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्सच्या शेअरची किंमत 49,150 पट वाढली आहे.

नुवामा फर्मचा या स्टॉक्सवर विश्वास

ब्रोकरेज फर्म नुवामाने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की, या यादीमध्ये समाविष्ट असलेले विनती ऑरगॅनिक्सचे स्टॉक्स खूप सकारात्मक आहेत.

विनती ऑरगॅनिक्सची बाजारपेठेतील भक्कम स्थिती पाहता, आम्ही त्याच्यात दीर्घकालीन गुंतवणूक करण्याबाबत सकारात्मक आहोत. मॅक्रो हेडविंड्स सुलभ झाल्यामुळे महसूल वाढ सुधारेल अशी आमची अपेक्षा आहे.

हे स्टॉक्सही ठरले मल्टीबॅगर

पॉली मेडीक्योर, बजाज फायनान्स, सेरा सॅनिटरीवेअर, सफारी इंडस्ट्रीज (इंडिया), एरो ग्रीनटेक, जेएसडब्ल्यू स्टील, जिंदाल वर्ल्डवाईड आणि रिलॅक्सो फूटवेअर्स यांचाही या समभागांच्या यादीत समावेश आहे ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या 20 वर्षात या स्टॉक्सची किंमत 1,000 ते 1,420 पटीने वाढली आहे.

ऑगस्ट 2002 मध्ये, बजाज फायनान्स स्टॉकच्या शेअरची किंमत फक्त 4 रुपये होती. दुसरीकडे, गुरुवारी, 15 जून 2023 रोजी या शेअरची किंमत रु. 7104 वर पोहोचली आहे. या दीर्घ कालावधीत, या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक परतावा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

SCROLL FOR NEXT