Mukesh Ambani Dainik Gomantak
अर्थविश्व

Mukesh Ambani: डबल धमाका, मुकेश अंबानींनी कंपनी विकत घेताच...

Mukesh Ambani Latest News: आजही म्हणजेच सोमवारी कंपनीचे शेअर्स 4.98 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत.

दैनिक गोमन्तक

Multibagger Stock: मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी चॉकलेट कंपनीत हिस्सेदारी विकत घेतल्यानंतर कंपनीचे शेअर्समध्ये दररोज उच्चांक पाहायला मिळत आहेत. आजही म्हणजेच सोमवारी कंपनीचे शेअर्स 4.98 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत. Lotus Chocolate असे या कंपनीचे नाव आहे.

रिलायन्स रिटेलने 2 आठवड्यांपूर्वी कंपनीसोबत मोठ्या कराराची घोषणा केली होती, त्यानंतर शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात स्टॉकमध्ये 100 टक्क्यांहून अधिक वाढ होत आहे. 5 दिवसांत शेअर 21 टक्क्यांहून अधिक वाढला.

दरम्यान, सोमवारी कंपनीचे शेअर्स 209.90 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. 5 दिवसांपूर्वीचा चार्ट पाहिला तर 10 जानेवारीला शेअरचा (Share) भाव 172 रुपयांच्या पातळीवर होता. गेल्या 5 दिवसांत शेअर्समध्ये 21.47 टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत शेअरची किंमत 37.10 रुपयांनी वाढली आहे.

एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले

याशिवाय, जर आपण एका महिन्यापूर्वीचा चार्ट पाहिला तर, या शेअरची किंमत 16 डिसेंबर 2022 रोजी 104.50 रुपयांच्या पातळीवर होता. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये 105.40 रुपयांची वाढ झाली आहे. या कालावधीत स्टॉकने 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

म्हणजेच, एखाद्या गुंतवणूकदाराने (Investors) महिन्याभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे पैसे आज 2 लाखांपेक्षा जास्त झाले असते.

YTD वेळेत स्टॉक 62 टक्क्यांनी वाढला

जर तुम्ही YTD वेळेचा चार्ट पाहिला तर 2 जानेवारी रोजी शेअरची किंमत 129 रुपयांच्या पातळीवर होती. YTD वेळेत स्टॉकमध्ये 62.65 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या कालावधीत शेअरचे मूल्य 80.85 रुपयांनी वाढले आहे.

रिलायन्सने खरेदी करण्याची ऑफर दिली

रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने लोटस चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये 26 टक्के हिस्सा खरेदी करण्याची ऑफर दिली आहे, त्यानंतर शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT