PM Narendra Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

मोदी सरकारने आजपासून सुरु केली 'ही' योजना, दरमहा मिळणार तब्बल एवढे हजार!

Manish Jadhav

Mera Bill Mera Adhikar Scheme: केंद्र सरकारने एक खास योजना सुरु केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला करोडो रुपये जिंकण्याची संधी आहे. 'मेरा बिल, मेरा अधिकार' असे या योजनेचे नाव आहे.

आज सरकारने ही योजना 6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरु केली आहे. सध्या चालू आर्थिक वर्षात शासनाने बक्षीस रकमेसाठी 30 कोटी रुपयांचा निधी तयार केला आहे.

50 हजारांहून अधिक लोकांनी अ‍ॅप डाउनलोड केले

हरियाणाचे (Haryana) उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले की, योजनेचे मोबाईल अॅप आतापर्यंत 50,000 हून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे.

लकी ड्रॉ काढला जाईल

महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांनी सांगितले की 'माय बिल, माय राइट' जीएसटी लकी ड्रॉ सहा राज्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरु करण्यात येत असून केंद्र आणि राज्ये बक्षीस रकमेत समान योगदान देतील.

नागरिक आणि ग्राहकांना फायदा होईल

मल्होत्रा ​पुढे ​म्हणाले की, 'जीएसटीमुळे नागरिक, ग्राहक आणि सरकारला फायदा झाला आहे. महसुलात दर महिन्याला वाढ होत आहे आणि केंद्र आणि राज्यांनी एकत्र येऊन GST अंतर्गत कराचे दर कमी आहेत याची खात्री केली आहे. आज सरासरी जीएसटी दर 12 टक्के आहे, तर लॉन्चच्या वेळी तो 15 टक्के असण्याचा अंदाज होता.

या राज्यांमध्ये योजना सुरु झाली

चालू आर्थिक वर्षात दरमहा सरासरी जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी रुपये आहे. सरकारने शुक्रवारी 'माय बिल, माय राइट' योजना प्रायोगिक तत्त्वावर 1 सप्टेंबरपासून आसाम, गुजरात आणि हरियाणा आणि पुद्दुचेरी, दादरा नगर हवेली आणि दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरु केली.

दर महिन्याला 810 लकी ड्रॉ होतील.

या योजनेअंतर्गत दर महिन्याला 810 लकी ड्रॉ होतील. प्रत्येक तिमाहीत दोन बंपर लकी ड्रॉ होतील.

800 लोकांना 10,000 रुपये मिळतील

ग्राहक त्यांची GST बिले अ‍ॅपद्वारे अपलोड करुन योजनेत सामील होऊ शकतात आणि लकी ड्रॉद्वारे बक्षिसे जिंकू शकतात. मासिक सोडतीमध्ये 800 जणांना 10,000 रुपयांचे बक्षीस आणि 10 जणांना 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. प्रत्येक तिमाहीत 1 कोटी रुपयांचा बंपर ड्रॉ होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT